संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी शिक्षकाची भूमिका महत्त्वाची : अशोककुमार पगारिया

पिंपरी : आजच्या विज्ञान तंत्रज्ञान व भौतिक व्यवस्थेच्या जाळ्यामध्ये संस्कार पासून दुरावत चाललेल्या समाजाला संस्कारक्षम करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी शिक्षकाची आहे, असे प्रतिपादन डॉ .अशोक पगारिया यांनी सोमवारी (दि ८) व्यक्त केले.

भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीच्या प्रीतम प्रकाश महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळ आणि राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत सत्कार समारंभात ते बोल्ट होते. पगारिया म्हणाले, ‘समर्पण, श्रद्धा, सखोल ज्ञान, अनुशासन आणि चारित्र्य ही शिक्षकी पेशाची पंचसूत्री आहे. आजच्या प्रगत वैज्ञानिक काळात अनुभवाचे बोलच महत्त्वाचे ठरतात. अनुभव आपल्याला शिक्षकच देतात. त्या अनुभवाच्या आधारे सक्षम पिढी तयार होते. हीच सक्षम पिढी समाजाचे भावी नेतृत्व करते. हे नेतृत्व करण्याची भूमिका विद्यार्थ्यात निर्माण व्हावी. ‘
याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य सदाशिव कांबळे, विद्यार्थी विकास मंडळाचे प्रमुख डॉ. स्वाती वाघ, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा. सचिन पवार, उपस्थित होते. विद्यार्थी झालेल्या शिक्षकांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. प्रा.सचिन पवार यांनी प्रास्ताविक केले. डॉ.स्वाती वाघ यांनी प्रमाणपत्राचे वाचन केले. पूर्वा बरगड या विद्यार्थ्यांनीने आभार मानले.