फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

उद्योगनगरीत मराठा शांतता फेरी !

उद्योगनगरीत मराठा शांतता फेरी !

मुद्द्याचं बोला न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरु केले आहे. पुण्यात झालेल्या फेरीत रविवारी शहरातील मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

‘एक मराठा लाख मराठा’ असे लिहिलेल्या भगव्या टोप्या, भगव्या पताका आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला. निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात सकाळी साडेदहा वाजता शिवराय आणि तुकोबा भेटीचे शिल्प येथील पुतळ्याचे दर्शन घेऊन पिंपरी- चिंचवडमधील फेरीला सुरुवात झाली. अत्यंत शिस्तबद्धपणे या चौकातून फेरी पुण्याकडे मार्गस्थ झाली.

अग्रभागी असणाऱ्या रथावरील छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा लक्षवेधी होता. दुचाकी, चारचाकी वाहनांनी मोठ्या प्रमाणावर शहरातील विविध भागातील मराठा बांधव या फेरीमध्ये सहभागी झाले होते. वाहतुकीला कोणताही अडथळा न करता फेरी मार्गस्थ झाली. या मार्गावरील निगडी टिळक चौक, आकुर्डी खंडोबामाळ चौक, चिंचवडस्टेशन महावीर चौक, चिंचवडस्टेशन चौक, मोरवाडी चौक, पिंपरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक, नाशिक फाटा, दापोडी चौक अशा विविध ठिकाणी असणाऱ्या राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून फेरी पुण्याकडे मार्गस्थ झाली. या फेरीत सतिश काळे, नकुल भोईर, प्रकाश जाधव, मारुती भापकर, अभिषेक म्हसे, वैभव जाधव, सागर तापकीर, मिरा कदम, सुनिता शिंदे, जिवण बोराडे, शशिकांत औटी, संदीप नवसुपे, प्रमोद पाटील, योगेश शिंदे आदी सहभागी झाले होते.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"