विद्यार्थ्यांचे मतदार जागृती अभियान

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : मतदार जनजागृती अभियानांतर्गत मॉडर्न कॉलेज निगडी येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रांगोळी, पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली.
या उपक्रमास २५० ते २७० विद्यार्थी उपस्थित होते. हे मतदार जनजागृती अभियान राबवण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी रेवणनाथ लबडे व तहसीलदार सतिष थेटे यांचे मार्गदर्शन लाभले. स्वीप अधिकारी श्री.संजय धोत्रे यांनी मतदानाचे महत्त्व पटवून दिले.सौ. सुवर्णा डुंबरे मॅडम यांनी व्होटर अॅप्लिकेशन तसेच स्कॅनरद्वारे मतदार यादीत नाव शोधणे या विषयी माहिती दिली. सौ.योजना सोनवणे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मतदान प्रतिज्ञा दिली. या अभियानासाठी सहाय्यक नोडल अधिकारी रजिया खान मॅडम. कॉलेजच्या प्राचार्या आणि सर्व अध्यापक वृंद याठिकाणी उपस्थित होते.

दोन अर्जांची विक्री
विधानसभा निवडणुकीसाठी भोसरी विधानसभा मतदार संघासाठी आज २५ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत दोन व्यक्तींनी उमेदवारी अर्ज नेले आहेत. मात्र, अद्याप कोणीही अर्ज दाखल केलेला नाही.