फक्त मुद्द्याचं!

3rd February 2026
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवडचे महापौरपद नागरिकांच्या मागासवर्गीय प्रवर्गाला बहाल!

पिंपरी चिंचवडचे महापौरपद नागरिकांच्या मागासवर्गीय प्रवर्गाला बहाल!

पिंपरी: पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण गटासाठी आरक्षित असताना नागरिकांच्या मागासवर्गीय प्रवर्गातून निवडून आलेल्या व्यक्तीला हे पद बहाल करण्यात आल्याने सर्वसाधारण गटातील इच्छुक असलेल्या अनेकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. महापालिकामध्ये प्रत्येक अडीच वर्षांनी महापौर पदाची आरक्षण सोडत काढली जाते. या आरक्षण सोडतील महापौरपदाचे आरक्षण असेल त्यांनाच पद द्यावे हा प्रोटोकॉल आहे. मात्र स्थानिक राजकारणी आपले राजकीय वजन वाढवण्यासाठी अशा राजकीय खेळी करत असतात.

viara vcc
viara vcc

आम्ही सर्वसाधारण प्रवर्गात महापौरपद असताना देखील अन्य आरक्षित नसणाऱ्यांना महापौरपद दिले असा टेंबा नेहमी मिरवतात .परंतु कधीतरी आपल्याला महापौर पदाची संधी मिळेल अशा भ्रमात असणारे इच्छुक अशा राजकारणामुळे नाराज होतात. आता सर्वसाधारण महापौरपदाचे आरक्षण किती वर्षांनी पडणार याची वाट पहात थांबावे लागणार आहे. त्यावेळी सध्याचे इच्छुक असणारे अनेक जण राजकारणातून निवृत्त देखील होतील. पिंपरी चिंचवडचे महापौर पद प्रभाग क्रमांक सहा मधून बिनविरोध निवडून आलेले रवी लांडगे यांना बहाल करण्यात आले आहे. लांडगे हे प्रभाग क्रमांक सहा मधून नागरिकांच्या मागासवर्गीय प्रवर्गातून निवडून आले आहेत .त्यामुळे सर्वसाधारण गटातील इच्छुकांचा भ्रमनिरास झाला आहे .

उमेदवारांनी ज्या प्रवर्गातून निवडणूक लढवली याचा विचार होणे गरजेचे आहे. जर आरक्षण सोडत अनुसूचित जाती, अनुसूची जमाती, नागरिकांचा मागासवर्गीय या प्रवर्गात असेल तर सर्वसाधारण गटातील इच्छुकांना हे पद उपभोगता येत नाही. मात्र मागास प्रवर्गातील उमेदवारांना सर्वसाधारण गटात संधी दिली जाते. हा प्रकार अन्यायकारक आहे .मात्र राजकारणी याचा कधीच विचार करत नाहीत. आपल्या राजकीय खेळीसाठी पक्षश्रेष्ठींना विनवणी करून अशा खेळी खेळून अनेकांचे राजकीय भवितव्य संपविले जाते. महापौर पद सर्वसाधारण असताना नागरिकांच्या मागासवर्गीय प्रवर्गातून निवडून आलेल्या इच्छुकाला अन्य पद दिले जाऊ शकले असते .भविष्यात महापालिका स्थायी समिती अध्यक्षपद देखील तुम्हीच उपभोगणार ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.

तीन वेळा महापालिकेत प्रतिनिधित्व करणारे विजय उर्फ शितल शिंदे यांच्यावर कोणताही राजकीय वरहस्त नसल्याने त्यांना डावलण्यात आले आहे .त्यांना उपमहापौर पद देण्याचे निश्चित झाले असताना त्यांनी हे पद नाकारून आपला स्वाभिमान दाखवला आहे. पिंपरी चिंचवड शहर भाजप अध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे हे सुद्धा महापौर पदासाठी इच्छुक होते .गेल्या दोन टर्म मध्ये त्यांना कोणतेही पद दिले नाही तरी देखील ते ज्येष्ठ असताना डावलले आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता येणार असा विश्वास त्यांनी निवडणुकीपूर्वी जाहीर केले होते. निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी ते खरे करून दाखवले याची दखल पक्षश्रेष्ठींनी का घेतली नाही? हा एक चर्चेचा विषय आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"