फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
अध्यात्म

तुकोबांच्या पादुका बोटा इथं हेलिकॅप्टरने मार्गस्थ

तुकोबांच्या पादुका बोटा इथं हेलिकॅप्टरने मार्गस्थ

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
देहू, प्रतिनिधी : जगदगुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठगमन वर्षानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यासाठी तुकोबांच्या पादुका श्री संत तुकाराम महाराज मंदिर येथून संगमनेर येथील बोटा या गावी नेण्यात आल्या. हरिनाम गजरात पुणे ते बोटा या मार्गावरील विविध मंदिरांवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली.

श्रीक्षेत्र देहू येथून संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज ह.भ.प. प्रशांत महाराज संभाजी मोरे देहूकर, जालिंदर गागरे यांच्या हस्ते पुष्पवृष्टी करण्यात आली. कोरेगाव येथील हेलिपॅडवरून दुपारी दोनच्या सुमारास पादुका हेलिकॉप्टर मधून बोटा गावाकडे नेण्यात आल्या. मार्गावर हेलिकॉप्टरमधून श्रीक्षेत्र आळे येथील माउलींनी रेड्यामुखी वेद वदविले. रेडा समाधी मंदिर, परिसरातील काही स्वयंभू मंदिरावर पुष्पवृष्टी केली. त्यानंतर या मार्गावरील श्री रेडा समाधी मंदिर आळे, आई कळमजाई माता मंदिर मोरदरा, मळगंगा माता मंदिर म्हसवंडी, रामदास बाबा मंदिर बेलापुर, भोजामाता मंदिर भोजदरी, खंडोबा मंदिर वनकुटे, हनुमान मंदिर कोठे खुर्द, हनुमान मंदिर जवळेबाळेश्वर, कळमजाई माता महाल वाडी, श्रीखंडोबा मंदिर सावरगाव घुले, श्रीक्षेत्र बाळेश्वर शिखर मंदिर, शिव मंदिर पोखरी बाळेश्वर, कानिफनाथ मंदिर तळेवाडी, बिरोबा महाराज मंदिर साकुर, भगवती माता मंदिर नांदुर, विठ्ठल मंदिर येठेवाडी, खंद्रेश्वर मंदिर खंदरमाळ वाडी, काळ भैरवनाथ डोळासणे, म्हसोबा मंदिर वरुडी, काळभैरवनाथ माळेगाव, शनैश्वर मंदिर, आंबी खालसा, हनुमान मंदिर तांगडी अशा सुमारे ४० मंदिरांवर पुष्पवृष्टी केली. पादुका हेलिकॉप्टरने चारला बोट्यात पोहोचल्या.

प्रशांत महाराज मोरे म्हणाले, ‘ही वैभवी पुष्पवृष्टी आणि श्रींचे पवित्र पादुका बोटा येथे मंगलमय धार्मिक कार्यक्रम परंपरांचे पालन करीत आणल्या. या अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत गाथा पारायण सोहळ्यात राज्यातील तसेच जागतिक आणि राष्ट्रीय कीर्तनकार यांची कीर्तन, प्रवचन सेवा दे आहेत. या सोहळ्यातील ज्ञानदान आणि अन्नदान महाप्रसाद वाटप सेवा परंपरेने सुरु आहे. पादुका दर्शनास भाविकांनी मोठी गर्दी केली.’

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"