फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
मनोरंजन

फक्त १०० रुपयांत बघा शो मॅनचे सिनेमे

फक्त १०० रुपयांत बघा शो मॅनचे सिनेमे

आग, बरसात, आवारा, श्री४२०, जागते रहो, जिस देश मे गंगा बहती है, संगम, मेरा नाम जोकर, बॉबी, राम तेरी गंगा मैली..

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : भारतातील ४० शहरं आणि १३५ चित्रपटगृहांमध्ये राज कपूर या एका व्यक्तीच्या सिनेमांचा महोत्सव लवकरच सुरू होणार आहे. जगभरातल्या लाडक्या या शो मॅनच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त हा महोत्सव होणार आहे. १३ डिसेंबर पासून हा महोत्सव सुरू होऊन तो तीन दिवस चालेल.

गोवा येथे भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीमध्ये रणबीर कपूर याने अशा प्रकारचा चित्रपट महोत्सव भरविला जाणार असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार महोत्सवाची घोषणा करण्यात आली होती. राज कपूर यांचे भारतीय सिनेमासाठी असलेले योगदान आणि त्यांच्या कारकि‍र्दीचा सन्मान करण्यासाठी हे सिनेमे पुनर्पदर्शित होत आहेत. राज कपूर १०० – सेलिब्रेटिंग द सेनटेनरी ऑफ द ग्रेटेस्ट शोमन असे नाव या महोत्सवाला दिले आहे.

राज कपूर यांचे सर्वाधिक लोकप्रिय ठरलेले १० सिनेमे या महोत्सवात दाखविले जाणार आहेत. राज कपूर हे भारतीय चित्रपटसृष्टीतील महान चिआणि लोकप्रिय सिनेकर्त्यांपैकी एक मानले जातात. वडील पृथ्वीराज कपूर यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी या क्षेत्रात पदार्पण केले आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

काय सांगितले रणबीर कपूर याने..
आमची पिढी राज कपूर यांच्या दिग्गजांच्या कामातून प्रेरित झालेली आहे. सर्वसामान्य माणसाला मध्यवर्ती ठेवत त्यांनी त्या काळी उत्तमोत्तम कथा पडद्यावर साकारल्या. ते कलासुसंगत सिनेमे आजही तरुणांना प्रोत्साहनच देतात. त्यांच्या सिनेमाची तीच जादू अनुभवण्याची संधी सिनेरसिकांना मिळणार आहे.

महोत्सवात कोणते सिनेमे पहाल?
आग, बरसात, आवारा, श्री४२०, जागते रहो, जिस देश मे गंगा बहती है, संगम, मेरा नाम जोकर, बॉबी, राम तेरी गंगा मैली हे सिनेमे महोत्सवांमध्ये बघता येतील. पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलिस या सिनेमागृहांमध्ये हे सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. या सिनेमांच्या तिकिटांचे दर फक्त १०० रुपये ठेवण्यात आले आहेत.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"