फक्त मुद्द्याचं!

19th April 2025
पिंपरी-चिंचवड

चिंचवड येथे उभारलेल्या २० लाख लिटर पाण्याच्या टाकीमुळे पाणीपुरवठा होणार सुरळीत !

चिंचवड येथे उभारलेल्या २० लाख लिटर पाण्याच्या टाकीमुळे पाणीपुरवठा होणार सुरळीत !

पाण्याच्या टाकीचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते लोकार्पण
पिंपरी : चिंचवड परिसरातील लोकप्रतिनिधी, तसेच नागरिकांची पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी सातत्याने मागणी होत होती,पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नव्याने उभारण्यात आलेल्या २० लाख लिटर पाण्याची टाकीमुळे या परिसरातील नागरिकांची सोय होणार आहे तसेच सर्वांना स्वच्छ पाणी मिळावे, पाणी पुरवठा नियोजनबद्ध व्हावा, यासाठी पुढील काळातही महापालिकेने अशाच पद्धतीने नियोजन करून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करावा असे मत आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने चिंचवड येथील जुन्या एल्प्रो कंपनीजवळ नव्याने उभारलेल्या २० लाख लिटरच्या पाण्याचे टाकीचे लोकार्पण आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी , माजी महापौर अपर्णा डोके, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील ,मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंता अजय सुर्यवंशी,माजी नगरसदस्य नामदेव ढाके,सचिन चिंचवडे,राजेंद्र गावडे,सुरेश भोईर,ॲड.मोरेश्वर शेडगे,विठ्ठल भोईर,माजी नगरसदस्या अश्विनी चिंचवडे माधुरी कुलकर्णी, कार्यकारी अभियंता विजय सोनवणे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,उप अभियंता प्रविण धुमाळ यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते ,पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी,विविध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आमदार शंकर जगताप म्हणाले की, ‘चिंचवड परिसरातील अनेक भागांतील पाणी पुरवठा सुरळित होण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या २० लाख लिटर पाण्याची टाकीची मदत होणार आहे. महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी हे नागरिकांना उत्तम सेवा मिळाव्यात, नियमित पाणी पुरवठा करता यावा, यासाठी काम करीत आहेत, पुढील काळात देखील त्यांनी वाढती लोकसंख्या विचारात घेऊन पाणीपूरवठ्याचे नियोजन करावे असे मत व्यक्त केले तसेच जागतिक महिला दिनानिमित्त शहरातील महिला भगिनींना शुभेच्छाही दिल्या.

आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महानगरपालिकेच्या पाणीपूरवठा विभागातील साधना ठोंबरे आणि प्रिती कासार या कनिष्ठ अभियंत्यांचा तसेच टाकीचे बांधकाम करणारे बांधकाम व्यावसायिक जे.डी.खानदेशे यांचा सत्कार करण्यात आला.

उन्हाळा सुरू झाला असून याकाळात पाण्याची बचत करण्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. चिंचवड येथील नव्याने उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीमुळे याभागातील सुदर्शननगर,तानाजी नगर, केशवनगर, श्रीधरनगर यासह चिंचवड गावातील पाणी पुरवठा सुरळित होण्यास अधिक मदत होणार आहे असे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील म्हणाले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारीअभियंता विजय सोनवणे यांनी,सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर आभार प्रविण धुमाळ यांनी मानले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"