भाजपा कार्यकर्त्यांकडून पिंपरीत जल्लोष

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र विधिमंडळ पक्षनेते पदी देवेंद्र फडणवीस यांची घोषणा करण्यात आली आहे, त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्या मुंबईत फडणवीस शपथ घेतील आणि जनतेच्या मनातील महायुतीचे सरकार स्थापित होणार आहे, हे स्पष्ट झाले आहे. त्याबद्दल भाजपा कार्यकर्त्यांनी पिंपरीत जल्लोष साजरा केला.
विधिमंडळ पक्षनेते पदी निवड तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीबाबत पिंपरी चिंचवड भाजप शहर कार्यकारणी तसेच कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असून ते साजरा करण्यासाठी चिंचवड येथील चाफेकर चौक याठिकाणी सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी एकत्र येत जल्लोष साजरा केला. पिंपरी चिंचवड शहराच्या भरभराटी मध्ये तसेच विकासामध्ये आणखीन भर घालण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब यांचा पुढाकार मोलाचा ठरणार असल्याची भावना आज प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहे.

यावेळी भाजप पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) कार्यकारी अध्यक्ष श्री शत्रुघ्न काटे,श्री नामदेव ढाके, श्री चंद्रकांत अण्णा नखाते,श्री सचिन चिंचवडे,श्री राजेंद्र गावडे,श्री बाबा त्रिभुवन,श्रीमती जयश्रीताई गावडे,श्रीमती अश्विनीताई चिंचवडे,श्री कैलास सानप,श्री रवी देशपांडे,श्री जयनाथ काटे,श्री मधुकर बच्चे,श्री अजित कुलथे, श्री रमेश काळे,,श्री योगेश चिंचवडे,श्री महेश कुलकर्णी,श्री प्रभुणे काका,श्री भूषण जोशी,श्री प्रदीप सायकर,श्री शालिग्राम,श्री प्रमोद ताम्हणकर,श्री काळुराम बारणे, श्री प्रशांत अगण्यान,श्री संजय भोसले,श्री विठ्ठल भोईर तसेच भाजप आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.