गुंतवणुकीवर ज्यादा परतावा देण्याचे आमीष; 15 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक!

पिंपरी : गुंतवणुकीवर पाच ते सात टक्के ज्यादा परतावा देण्याचे आमीष दाखवून दोन व्यक्तींची सुमारे 15 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. ही घटना 16 जुलै 2025 ते 3 मार्च 2026 या दरम्यान क्रिसांता स्काय लाईन सोसायटी, सी 405, किवळे, ता हवेली) येथे घडली.

या प्रकरणी एका 38 वर्षीय महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सौरव सुरेशचंद्र खटाटे (वय 37, सी 45, नवशांती निकेतन, आकुर्डी, डी वाय पाटील कॉलेज जवळ रावेत) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने फिर्यादी व साक्षीदार अमय ढवळे यांना त्यांचे गुंतवणुकीवर पाच ते सात टक्के जादा परताव्याचे आमिष दाखवून दोघांकडून क्रेडिट कार्डद्वारे 15 लाख 25 हजार रुपयांची गुंतवणूक करून घेतली .त्यातील दोन लाख पाच हजार रुपये परतावा स्वरूपात परत दिला.उर्वरीत गुंतवणूक केलेली रक्कम परत न करता फसवणूक केली. देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक डोंगळे हे पुढील तपास करत आहेत.

