फक्त मुद्द्याचं!

16th June 2025
गुन्हेगारी

अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (१५ ऑगस्ट) सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील बहुळ गावात घडला.

कांताराम दादाभाऊ गावडे (वय ३५) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी नवनाथ किसन जाधव (वय ३४, रा. बहुळ, ता. खेड) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव यांचे मेहुणे कांताराम गावडे हे शिक्रापूर-चाकण रस्त्यावर बहुळ गावच्या हद्दीत रस्त्याने पायी चालत जात होते. त्यावेळी त्यांना भरधाव ट्रकने धडक दिली. त्यामध्ये ते मयत झाले. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलिस तपास करीत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"