फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
कला साहित्य

प्रभावी अभिनय आणि कथानकाने प्रेक्षकांची मने जिंकली!

प्रभावी अभिनय आणि कथानकाने प्रेक्षकांची मने जिंकली!

अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने
पिंपरी : अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे सादर करण्यात आलेले ‘सूर्यांची पिल्ले’ हे नाटक प्रेक्षकांच्या मनाला भावले. प्रभावी संवाद, सशक्त अभिनय आणि सुंदर सादरीकरणाच्या बळावर या नाटकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. कलाकार पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, अनिकेत विश्वासराव, सुनील बर्वे, सुहास परांजपे आणि शर्वरी पाटणकर यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणाऱ्या ठरल्या.

viara vcc
viara vcc

मराठीचा, जागर शाहिरीचा
अभिजात मराठी भाषा सप्ताहात आकुर्डी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात सादर झालेला ‘गजर मराठीचा, जागर शाहिरीचा’ हा कार्यक्रम लोककला आणि मराठी अभिमानाचा अद्भुत संगम ठरला. या कार्यक्रमात सादर झालेल्या शाहिरी कलाकृतींनी मराठी भाषेचा गजर आसमंतात दुमदुमवला. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक गणगायनाने झाली. त्यानंतर ‘माझ्या जिजाऊची पुण्याई’, ‘चमके शिवबाची तलवार’ अशा विविध पोवाड्यांनी सभागृहात उत्साह आणि जोश चेतवला. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या गौरवगाथेवरील नाट्यमय सादरीकरणाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.

या कार्यक्रमात शाहीर प्रकाश ढवळे, अशोक कामटे, चैतन्य काजोळकर, वनिता मोहिते, नमन कांबळे, गुरुराज कुंभार तसेच वादक उद्धव गुरव (ढोलकी), वैभव गोरखे (संबळ), सुहास माळी (तुतारी), ईशा बांदिवडेकर, कस्तुरी चंद्रडकर, शाल्मली जोशी, नीना देशपांडे, चित्रा कुलकर्णी यांनी सहभाग घेतला. या सर्व कलाकारांनी केलेल्या दमदार सादरीकरणाने कार्यक्रमाला रंगत आणली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"