फक्त मुद्द्याचं!

3rd September 2025
अध्यात्म

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरावर सुवर्ण कलशारोहण पुजन; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते संपन्न!

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरावर सुवर्ण कलशारोहण पुजन; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते संपन्न!

 22 किलोचा सुवर्ण कलश समाधी मंदिरावर चढवण्यात आला
आळंदी : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानाद्वारे अखिल विश्वाच्या कल्याणाची भावना मांडली आहे ज्ञानेश्वरीतील हा विश्वात्मक विचार भारतीय संस्कृतीचे मूळ असून तो जगाला मार्गदर्शक आहे असे विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले आहेत . संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण जयंती दिनानिमित्त आयोजित संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरावर सुवर्ण कलशारोहण समारंभात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. भाविकांच्या वर्गणीतून तयार करण्यात आलेला हा 22 किलोचा सुवर्ण कलश समाधी मंदिरावर चढवण्यात आला.

viara vcc
viara vcc

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे , विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोर्हे, र्प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन , ह भ प मारुती महाराज कुरेकर , ह भ प नारायण महाराज जाधव , खासदार श्रीरंग बारणे ,आमदार उमा खापरे , बापूसाहेब पठारे , महेश लांडगे , बाबाजी काळे, देवेंद्र पोटे आदी उपस्थित होते .

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आपल्या संस्कृतीतील प्राचीन मूल्य जपण्याचे श्रेय वारकरी संप्रदायाला आहे. ही मूल्य विचारांची परंपरा पुढच्या पिढीपर्यंत नेल्याने आम्ही परकीय आक्रमण होत असताना राजकीय गुलामगिरी स्वीकारली, पण वैचारिक गुलामगिरी स्वीकारली नाही . वारकरी परंपरेने आणि संतांनी जात धर्म भेदामुळे गुलामगिरी जाणाऱ्या समाजात एकी निर्माण करण्याचे कार्य केले . माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून हीच शिकवण दिली आहे . 21.वर्षाच्या जीवनात त्यांनी दिलेला विचार आपल्याला शतकानू शतके मार्ग दाखविणारा आहे, म्हणूनच समाधी मंदिरात आल्यावर मिळणारी ऊर्जा चांगले काम करण्याची ऊर्जा मिळते असे त्यांनी सांगितले . विचार आणि तत्त्वज्ञान 21 वनाच्या निर्मळ प्रवाह असलेली भारतीय सभ्यता सर्वात जुनी सभ्यता आहे . हे जगाने मान्य केले असल्याचेही फडणवीस म्हणाले .

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की ,अर्जुनाला कर्म मार्ग दाखवण्यासाठी भगवान योगेश्वराने गीता सांगितली. गीतेचे मराठीत विवेचन करणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिरावर सुवर्ण कळस आजच्या दिवशी चढविला जाणे हा एक सुवर्णयोग आहे . भक्तांनी दान नव्हे तर समर्पण केल्याने हा सुवर्णकलस चढविता आला. सुवर्णकलशा सोबत महाजी शिंदे यांनी उभारलेल्या महाद्वाराचा जिर्णोद्वार केल्याने त्याला मूळ स्वरूप प्राप्त होईल आणि मंदिर परिसराच्या पावित्र्यात भर पडेल . भगवत गीतेतील तत्त्वज्ञान हे जगातले सर्वोत्तम तत्त्वज्ञान असून ते जगात स्वीकारले जात आहे . संत ज्ञानेश्वर महाराजांनी 9000 ओव्यांच्या माध्यमातून मांडलेले हे ज्ञान ऑडिओ बुकच्या माध्यमातून सर्व भाषेत उपलब्ध होणार असल्याने ते जगभरात पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .

श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी मंदिरावर सुवर्णकलत चढविला जाणे ही महत्त्वाची घटना आहे . भाविकांच्या योगदानामुळे या क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य सर्वांना मिळाले आहे वारकऱ्यांसाठी ज्ञानोबा हा श्वास आणि आळंदी ही काशी आहे . अलंकापुरी म्हणून परिचित असलेले आळंदी मराठीसाठी आणि भागवत धर्मासाठी महत्त्वाचे स्थान आहे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले मत मांडले .

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुवर्णकलश पूजन आणि श्री ज्ञानेश्वरी सार्थ ऑडिओ बुक विविध भाषेत उपलब्ध असलेल्या श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या संकेत स्थळाचे विमोचन करण्यात आले .उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाद्वार जीर्णोदवार कार्यारंभ पूजन करण्यात आले . मान्यवरांच्या हस्ते सुवर्णकलश आणि महाद्वारासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.

योगी निरंजनाथ यांनी प्रास्ताविकात सोहळ्याची माहिती दिली श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात सौर ऊर्जेचा उपयोग सुरू करण्यात आल्याची माहिती दिली. यावेळी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप , डॉक्टर भावार्थ देखणे , योगी निरंजनाथ , अॅड. रोहिणी पवार ,चैतन्य कबीर , पुरुषोत्तम पाटील आदी उपस्थित होते

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"