पावसामुळे पडलेली १० झाडे अग्निशमन विभागाने तात्काळ हटवली!

पवना, मुळशी, खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस
पिंपरी : पिंपरी पुणे पिंपरी चिंचवड आणि पवना, मुळशी, खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस झाल्याने धरणातून मुळा मुठा आणि पवना नदीपात्रांमध्ये 1000 क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे .रविवार रात्री आणि सोमवार 15 सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस पडल्याने नदी, नाले ओसंडून वाहत होते. यातच जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे पडली महापालिकेच्या अग्निशामक विभागाने तातडीने ही झाडे हटवून रस्ता मोकळा केला.

खडकवासला धरणातून आज सोमवार 15 सप्टेंबर रोजी 10529 क्युसेक पाण्याचा विसर्ग मुठा नदीत सोडल्याने भिडे पूल पाण्याखाली गेला .याशिवाय पिंपरी चिंचवड शहरात पडत असलेल्या पावसामुळे पवना नदी दुधडी भरून वाहत आहे मुळा नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे
पिंपरी चिंचवड शहरात १४ व १५ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या पावसामुळे १० ठिकाणी पडलेली झाडे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी हटवली. झाडे पडल्याची माहिती अग्निशमन विभागाला मिळाल्यानंतर जवानांनी घटनास्थळी धाव घेत ती हटवून वाहतूक सुरळीत केली आहे. यातील काही झाडे घरांवर/भिंतीवर पडून टेकली होती. ती झाडे जमिनीवर पूर्णपणे पडण्याच्या धोका संभवत असल्याने व त्यामुळे परिसरातून प्रवास करणाऱ्याच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने सदरील अर्धवट पडलेल्या झाडास पूर्णपणे बाजूला करण्यात आले.
शहरामध्ये १४ व १५ सप्टेंबर असे सलग दोन दिवस पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे शहरातील वेगवेगळ्या भागात झाडे, फांद्या पडल्या. याबाबतची माहिती अग्निशमन विभागाच्या मुख्य नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर अग्निशमन विभागाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तातडीने झाडे, फांद्या हटविण्याचे काम सुरू केले. १४ व १५ सप्टेंबर (सायंकाळी ४ वाजेपर्यंत) या दोन दिवसांमध्ये अग्निशमन विभागाच्या वतीने १० ठिकाणांतील झाडे हटवून वाहतूक सुरळीत केली आहे, अशी माहिती अग्निशमन विभागातून देण्यात आली. तसेच अर्धवट पडलेल्या झाडापासून नागरिकांनी दूर म्हणजेच सुरक्षित अंतर बाळगावे, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने अग्निशमन विभागाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

