पिंपरीत मिरवणुकीचा उत्साह; ढोल-ताशांचा निनाद!

पिंपरी : कराची चौकातील स्वागत कक्षातही सत्कार स्वीकारण्यासाठी मंडळांची लगबग होती. पिंपरी मिरवणुकीतील अखेरचे मंडळ रात्री ११.४५ वाजता येथे दाखल झाले. या कक्षामध्ये एकूण २९ मंडळाचे स्वागत करण्यात आले.
पिंपरी येथील कराची चौकात मंडळांचे स्वागत
शिवशंकर मित्र मंडळ, फाईव्ह स्टार मित्र मंडळ, हर्षल मित्र मंडळ, श्री नवचैतन्य तरुण मंडळ, शिवशक्ती मित्र मंडळ, फुले मार्केटचा राजा, महेश मित्र मंडळ, लालबहादूर शास्त्री मित्र मंडळ, स्वराज्य मित्र मंडळ, श्री महादेव मित्र मंडळ, एस पी मित्र मंडळ, जय भारत तरुण मंडळ, साईबाबा मित्र मंडळ, रमाबाई नगर मित्र मंडळ, १६ नंबर वाई मित्र मंडळ, श्री गणेश मित्र मंडळ, मोरया मित्र मंडळ, श्री साई तरुण मित्र मंडळ, न्यू स्टार मित्र मंडळ, गजानन मित्र मंडळ, दिग्विजय मित्र मंडळ, भागवत तरुण मंडळ.
ऐतिहासिक देखावे ठरले आकर्षण
पिंपरी व चिंचवड शहरात निघालेल्या मुख्य विसर्जन मिरवणुकीमध्ये राजमाता जिजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, वीर मुरारबाजी अशा ऐतिहासिक देखावे काही मंडळांनी सादर केले होते. या देखाव्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. पिंपरी येथील गणेश विसर्जन मिरवणुकीतील भक्तीशक्तीचा संदेश देणारा तसेच चिंचवड येथील मिरवणुकीतील माय मराठीचा गंध हा मराठी भाषेचा सन्मान करणारा विसर्जन रथ देखील गणेशभक्तांचे आकर्षण ठरले.
पिंपरी चिंचवड शहरातील गणेश उत्सव मंडळांनी पोलिसांनी केलेल्या आव्हानाला फाटा देऊन मिरवणुकीत लेझर थीम आणि डीजेचा वापर केला ध्वनीवर्धकांच्या आवाजामुळे विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या भाविकांना त्याचा त्रास झाला .ढोल ताशांच्या आवाजाची पातळी ही मर्यादेबाहेर होती.

क्षेत्रीय कार्यालयानुसार संकलित निर्माल्य (आकडेवारी ७ सप्टेंबर २०२५ )
•अ क्षेत्रीय कार्यालय – १८.८१ टन ,• ब क्षेत्रीय कार्यालय – ४८.७७ टन ,•क क्षेत्रीय कार्यालय – २६.४६ टन, •ड क्षेत्रीय कार्यालय – २७.४३ टन, •इ क्षेत्रीय कार्यालय – ३२.१६ टन ,• ग क्षेत्रीय कार्यालय – १६.२३ टन, •फ क्षेत्रीय कार्यालय – २५.५२ टन ,•ह क्षेत्रीय कार्यालय – २०.३० टन , *एकूण – २१५.७० टन
मूर्ती संकलन प्रभागनिहाय आकडेवारी
अ प्रभाग : ६,५९१ , ब प्रभाग : ३९,९३९ ,क प्रभाग : १९,८५९ ,ड प्रभाग : ८,१७१ ,ई प्रभाग : ६,४४६ ,फ प्रभाग : १७,४९० ,ग प्रभाग : ७,१७५,ह प्रभाग : ६,०६२ ,*एकूण : १,११,७२९
(पर्यावरण पूरक मूर्ती : २०,७२८ ,पीओपी मूर्ती : ९१,००२