फक्त मुद्द्याचं!

20th April 2025
पिंपरी-चिंचवड

प्रचाराचा अंगार फुलला, शंकर जगतापांसाठी वाल्हेकरवाडी, बिजलीनगरात माहोल रंगला!

प्रचाराचा अंगार फुलला, शंकर जगतापांसाठी वाल्हेकरवाडी, बिजलीनगरात माहोल रंगला!

चिंचवड : चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ वाल्हेकरवाडी, प्रेमलोक पार्क, बिजलीनगर या भागात झंझावाती प्रचार दौरा पार पडला. यावेळी वाल्हेकरवाडी येथे चक्क बैलगाडीतून शंकर जगताप यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यामुळे “हा प्रचार दौरा आहे की; भव्य विजयी मिरवणूक”? अशी चर्चा परिसरात रंगली होती.
शंकर जगताप यांच्या प्रचार दौऱ्याला चिंचवड येथील प्रेमलोक पार्क येथून सुरूवात झाली. फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात नागरिकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. तसेच जागोजागी नागरिकांनी जगताप यांच्यावर पुष्प वर्षाव केला.

सदर पदयात्रा पुढे इंदिरा नगर, दळवी नगर, रघूमाउली गार्डन, सुखनगरी सोसायटी, गिरीराज सोसायटी, बिजलीनगर, ओम कॉलनी, विवेक वसाहत, शिवनगरी, बळवंत नगर, दगडोबा चौक, चिंचवडे नगर मार्गे वाल्हेकर वाडी, आहेर नगर ते गुरुद्वारा चौक अशी काढण्यात आली. यावेळी जगताप यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेत त्यांच्याशी संवाद साधत कमळाला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच परिसरातील चिंतामणी गणेश मंदिर आणि स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेऊन विजयासाठी आशीर्वाद घेतला.

यावेळी माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, माजी नगरसेविका मोनाताई कुलकर्णी, माजी नगरसेवक शैलेश मोरे,सामाजिक कार्यकर्ते आबा वाल्हेकर,महिला मंडलध्यक्ष पल्लवी वाल्हेकर, शमीम पठाण, शेखर चिंचवडे, विनोद मालू, अनिल जगताप, माऊली जगताप, संतोष इंगळे, बिभीषण चौधरी, अमित भोईटे, अशोक वाळुंज, माऊली सूर्यवंशी, दत्तू खांबे, स्वीकृत नगरसेवक संदीप गाडे, निलेश लोखंडे, संजय ढोकले, तानाजी वाईकर, जयराज काळे, धनंजय वाल्हेकर, श्रीधर वाल्हेकर, सचिन शिवल, वाल्मीक शिवले, पल्लवी मारकड, बंडू मारकड, मनिषा पाटील, विशाल पाटील, अशोक बोडके, स्वप्निल सरवदे, चेतन महाजन, रुपेश पाटील, योगेश महाजन, शिवलाल पाटील, राजू पांढरकर, सुनील वाल्हेकर, ग्रेस कुलकर्णी, सतपाल गोयल, शरद पेद्दी, तेजस पांढरकर, तुषार पांढरकर, जोगळेकर काकू, खंडूदेव कटारे, रोहिणी भोईटे, रूपाला नल्ला, अश्विनी कदम, स्वाती वनवे, कस्तुरी जमखंडी, सुषमा वैद्य, शोभा पांढरकर, आसावरी ढोकले, कैलास रोटे, प्रदीप नेहते, राजेश फिरके, योगेश महाजन, मनोज पाटील, कुणाल इंगळे, भगवान निकम, वसंत नारखेडे, काका महाजन, योगेश महाजन, मारुती ढाके, ज्योती ढाके, सविता महाजन, भूषण पाटील, शुभम ढाके, भूषण माळी यांच्यासह मित्र पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मतदार संघ स्मार्ट करण्यावर माझा भर

चिंचवड आणि वाल्हेकरवाडी भागात यापूर्वी आमदार निधीतून अनेक चांगली विकासकामे झालेली आहेत. मात्र या भागात विकासकामांना अजूनही चांगला वाव असून त्या कामांना मी प्राधान्य देणार आहे. या परिसरात राज्य शासन आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून नवीन प्रकल्प आणि योजना आणून मतदार संघ स्मार्ट करण्यावर माझा भर असेल. तसेच मतदार संघात पायाभूत सुविधा निर्माण करू.
– शंकर जगताप (महायुतीचे उमेदवार)

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"