फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

काळेवाडी पुलाजवळील स्मशानभूमीतील शवदाहिनी नूतनीकरणामुळे राहणार बंद!

काळेवाडी पुलाजवळील स्मशानभूमीतील शवदाहिनी नूतनीकरणामुळे राहणार बंद!

नागरिकांनी पर्यायी स्मशानभूमीचा वापर करण्याचे आवाहन
पिंपरी : काळेवाडी पुलाजवळील त्रिलोक स्मशानभूमीमधील डिझेल शवदाहिनीच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून, या ठिकाणी पर्यावरणपूरक गॅस शवदाहिनी बसविण्यात येणार आहे. या कामासाठी अंदाजे सहा महिने कालावधी लागणार असल्याने सदर शवदाहिनी या कालावधीत बंद राहणार आहे, अशी माहिती विद्युत विभागाचे सहशहर अभियंता संजय खाबडे यांनी दिली आहे.

डिझेल शवदाहिनीऐवजी गॅस शवदाहिनी बसविण्याच्या कामामुळे प्रदूषणास आळा बसणार आहे. वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर आणि प्रदूषण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. स्मशानभूमीतील डिझेल शवदाहिनी ऐवजी नूतनीकरणाच्या कालावधीत नागरिकांनी पर्यायी स्मशानभूमीचा वापर करावा, असे आवाहन विद्युत विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"