अशोक सराफ, अश्विनी भिडे, अच्युत पालव `पद्म`चे मानकरी

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. अभिनेता अशोक सराफ, ज्येष्ठ शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ गायिक अश्विनी भिडे – देशपांडे, डॉ. विलास डांगरे, मारूती चितमपल्ली यांचा पद्म पुरस्कारार्थींमध्ये समावेश आहे.
पद्म पुरस्कार पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये सर्वोच्च पुरस्कार प्रदान केले जातात. कला, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यक, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा इत्यादी विविध शाखांमध्ये हे पुरस्कार दिले जातात. असामान्य आणि विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मविभूषण’ दिला जातो; उच्च श्रेणीतील विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मभूषण’ आणि कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने या पुरस्कारांची घोषणा केली जाते.

हे पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते दरवर्षी साधारणपणे मार्च/एप्रिलच्या सुमारास राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात प्रदान केले जातात. २०२५ वर्षासाठी एकूण १३९ पद्म पुरस्कार प्रदान करायला राष्ट्रपतींनी मान्यता दिली आहे. या यादीत सात पद्मविभूषण, १९ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये २३ महिला आहेत आणि या यादीत परदेशी/NRI/PIO/OCI या श्रेणीतील १० व्यक्ती आणि १३ मरणोत्तर पुरस्कारप्राप्त व्यक्तींचाही समावेश आहे.

महाराष्ट्रातून होमिओपॅथी चिकित्सव डॉ. विलास डांगरे, साहित्य क्षेत्रासाठी मारुती चितमपल्ली, चैत्राम पवार, जगदीश जोशी (हिंदी लेखक), नरेन सुरंग (लोकगायक), पैरो सिंह चौहान, अशोक सराफ, अश्विनी भिडे देशपांडे, अच्युत पालव, चित्रकार वासुदेव कामत यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. पीआर श्रीजेश तसेच ज्येष्ठ पत्रकार एय सूर्यप्रकाश यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. कर्नाटकचे लोकगायक वेंकप्पा अंबाजी यांचाही पद्नश्री पुरस्कारार्थींमध्ये समावेश आहे.