फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप आणि आमदार महेश लांडगे यांची उमेदवारी जाहीर

भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप आणि आमदार महेश लांडगे यांची उमेदवारी जाहीर

भाजपनं आमदार अश्विनी जगतापांच तिकीट कापलं
पिंपरी : भाजपने विधानसभेसाठी अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. अधिकृत यादीत चिंचवड मतदारसंघातून भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातून आमदार महेश लांडगे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून शंकर जगताप यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काहीजण जणांच्या आनंदावर निर्जन पडले आहे. तर भोसरी मध्ये देखील आमदार महेश लांडगे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने नवचैतन्य आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी कोणाला मिळणार यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अखेर भाजपने आज अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली. यात भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. विद्यमान आमदार आश्र्विनी जगताप यांची उमेदवारी कापण्यात आली. भाजपाचे साजी नगरसेवक शत्रुघ्न काठे, चंद्रकांत नखाते हे देखील इच्छुक होते. त्यानी शंकर जगताप याना उमेदवारी देण्यास विरोध केला होता. शंकर जगताप यांना भाजपा अंतर्गत नाराजीला तोंड द्यावे लागणार आहे. भाजपमधीलच काही माजी नगरसेवक बंड करण्याची शक्यता आहे. .
शंकर जगताप हे एकदा नगरसेवक राहिलेले असून सध्या ते भाजप चे शहराध्यक्ष आहेत. ते दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू आहेत, तर आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांचे दीर आहेत.

भोसरी विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार महेश लांडगे यांचा देखील समावेश आहे. आमदार महेश लांडगे हे 2004, 2007 आणि 2012 ला नगरसेवक राहिलेले आहेत. 2014 मध्ये अपक्ष तर 2019 ला भाजपमधून महेश लांडगे यांना जनतेने विधानसभेत निवडून दिले होते. आता देखील भोसरी विधानसभेत महेश लांडगे यांची मोठी ताकद आहे. आमदार महेश लांडगे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. महेश लांडगे यांच्या पुढे शरद पवार गटाचे अजित गव्हाणे यांचं आव्हान असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"