फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

निळ्या पूररेषीतील २७ अनधिकृत बांधकामावर हातोडा!

निळ्या पूररेषीतील २७ अनधिकृत बांधकामावर हातोडा!

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून पवना, मुळा व इंद्रायणी या तीन नद्यांच्या निळ्या पूररेषेतील बांधकामांचे नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणामध्ये आढळलेल्या बांधकामापैकी अनधिकृत व्यावसायिक बांधकामावर महापालिकेकडून आजपासून (मंगळवार) कारवाई सुरु करण्यात आली.

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सर्वप्रथम अनधिकृत व्यावसायिक बांधकामावर कारवाई सुरु केली असून महापालिकेच्या ब, ड, इ क्षेत्रीय कार्यालयामधील तब्बल २७ अनधिकृत व्यावसायिक बांधकामावर आज कारवाई करण्यात आली. यापुढे संपूर्ण बांधकामे निष्कासित करण्यात येणार असल्याचे अतिक्रमण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महापालिकेच्या ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयामध्ये ६ अनधिकृत व्यावसायिक बांधकामावर कारवाई करण्यात येऊन अंदाजे ५५०० चौरस.फूट क्षेत्र पाडण्यात आले आहे. सदर कारवाईमध्ये २० एमएसएफ जवान कारवाईसाठी उपस्थित होते. त्यासोबतच कारवाईसाठी २ जेसीबी वापरण्यात आले. ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयामध्ये ११ अनधिकृत वीटबांधकाम व पत्राशेडवर कारवाई करण्यात येऊन अंदाजे १६,००० चौरस.फूट क्षेत्र पाडण्यात आले आहे.

या कारवाईसाठी क्षेत्रीय अधिकारी, ३ अतिक्रमण अधीक्षक, ८ बीटनिरीक्षक, १० पोलीस कर्मचारी व १५ मजूर उपस्थित होते. याकारवाईसाठी २ जेसीबी, १ ट्रॅक्टर ब्रेकर अशी यंत्रणा लावण्यात आली होती. याचबरोबर, ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयामध्ये, १० अनधिकृत व्यावसायिक बांधकामावर कारवाई करण्यात येऊन अंदाजे १६,४०० चौरस.फूट क्षेत्र पाडण्यात आले आहे. यासाठी ४ क्षेत्रीय अधिकारी, १ अतिक्रमण अधीक्षक, ६ बीटनिरीक्षक, ३० पोलीस कर्मचारी व १५ मजूर त्याबरोबर, याकारवाईसाठी २ जेसीबीची यंत्रणा वापरण्यात आली.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"