चला, वन्यजीवांचे दस्तावेज करूया..

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : आपल्या सभोवतालच्या वन्यजीवांचे दस्तावेजीकरण करण्यासाठी अलाइव्ह चॅरिटेबल ट्रस्टने सर्व शाळांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
२५ एप्रिल रोजी मध्यरात्री १ वाजल्यापासून ही स्पर्धा सुरू होणार असून २८ एप्रिल रोजी रात्री बारा वाजेपर्यंत नागरिकांना निसर्गातील नोंदी घ्यायच्या आहेत. या चार दिवसात आपल्या परिसरात बागेत, पाणवठे, नदी काठ, कुठे बाहेरगावी गेले असल्यास तिथे स्थानिक वन्यजीवांचे निरीक्षण करुन मोबाईलने फोटो काढायचा आहे. ते फोटो काढून iNaturalist हे मोफत अॅप वापरून त्यावर अपलोड करायचे आहेत. स्पर्धेत सहभागासाठी आपली नोंदणी अत्यावश्यक आहे. नोंदणी लिंक https://alivetrust.in/en/cnc-registration/ किंवा क्यु आर कोड स्कॅन करुन नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
शहरी जैवविविधतेचा जागतिक उत्सव असलेल्या सिटी नेचर चॅलेंज (सीएनसी) २०२५ चा भाग म्हणून ही उपक्रम राबविण्यात येत आहे. सिटी नेचर चॅलेंज(सीएनसी) ही आपल्या सभोवताली असलेली जीविधता नोंदवण्याची एक जागतिक चळवळ असून, चळवळीचे हे दहावे वर्ष आहे. अलाईव्ह ट्रस्ट गेले काही वर्षे सातत्याने या चळवळीत सक्रिय सहभाग घेत आहे.
काय करावे लागेल?
पक्षी आणि फुलपाखरांपासून ते बुरशी आणि फुलांच्या वनस्पतींपर्यंत, निसर्ग सर्वत्र आहे – तुम्हाला फक्त निरीक्षण करावे लागेल. अलाईव्ह आयोजित सीएनसी २०२५ या स्पर्धेत विद्यार्थी, शिक्षक आणि समुदायांना सहभाग घेता येईल. २५ एप्रिल पहाटे ००.०१ मिनिटांनी सुरु होऊन २८ एप्रिल २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत नोंदी घ्यायच्या आहेत. या चार दिवसांत आपल्या परिसरात, बागेत, पाणवठे, नदी काठ, कुठे बाहेरगावी गेले असल्यास तिथे स्थानिक वन्यजीवांचे निरीक्षण करुन मोबाईलने फोटो काढायचा आहे. ते फोटो काढून iNaturalist हे मोफत अॅप वापरून त्यावर अपलोड करायचे आहेत. स्पर्धेत सहभागासाठी आपली नोंदणी अत्यावश्यक आहे. नोंदणी लिंक https://alivetrust.in/en/cnc-registration/ किंवा क्यु आर कोड स्कॅन करुन नोंदणी करावी.
वन्यजीव म्हणजे काय? सुरवात कुठून करावी?
अगदी घरापासून सुरवात करु शकता. आपल्या घरात दिसणारे कोळी, मुंग्या, पतंग, पाली, उंदिर, चिचुंदरी हे सुद्धा वन्यजीव मानले जातात. परिसरात दिसणारे फुलापाखरु, सरडा, साप, सरपटणारे प्राणी, पक्षी, अनेक प्रकारचे किटक, खारुताई, वटवाघूळ, माकड, वानर व अन्य सस्तन प्राणी हे सारे वन्यजीव आहेत. नदीकाठावर दिसणारे पक्षी, साप, कासव, मासे, विविध वनस्पती, चतुर सारखे कीटक यांचे फोटो काढून अपलोड करा. आपल्या नोंदीचा उपयोग शास्त्रज्ञांसाठी महत्वाचा डाटा ठरु शकतो. याच डाटाच्या विश्लेषणाने त्या परिसरात होणारे बदलाचा अभ्यास केला जातो. तसेच या नोंदींमुळे कोणतेही भावी विकासकामांमुळे जर वन्यजीवांचा अधिवास नष्ट होण्याची शक्यता असेल तर ते थांबवता येते.
हे नको:
पाळलेले प्राणी, पेरलेले झाड हे नको, वन्यजीवाचे वेगवेगळ्या बाजून फोटो काढले असल्यास त्याची एकाच नोंदीत फोटो अपलोड करावे, वेगवेगळे नोंदी नको. उदा. एका झाडाचा खोडाचा आणि फूल किंवा फळाचे फोटो वेगवेगळे न टाकता एक नोंद मधेच अपलोड करावे, अशी माहिती उमेश वाघेला यांनी दिली आहे.