बाधित लघुउद्योजकांना चिखली भागातच औद्योगिक पार्क उभारून पुनर्वसन करुन नुकसान भरपाई द्यावी!

पिं.चिं लघु उद्योजक संघटनेची विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्याकडे मागणी
पिंपरी : कुदळवाडी चिखली येथील लघु उद्योजकांसाठी पिं चिं महानगरपालिकेने विकसित औद्योगिक पार्क बनवून उद्योजकांचे पुनर्वसन करून उद्योजकांना महानगरपालिका व महाराष्ट्र शासनाने नुकसान भरपाई करून द्यावी, अशी मागणी लघु उद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी उपसभापती अण्णा बनसोडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
.बनसोडे यांच्यासोबत संघटनेच्या शिस्टमंडळाची बैठक विधानभवन मुंबई येथे संपन्न झाली. यावेळी संघटनेचे सचिव जयंत कड उपाध्यक्ष संजय जगताप,संचालक संजय सातव,नवनाथ वायाळ, भरत नरवडे , पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे आदी उपस्थित होते.

कुदळवाडी चिखली या परिसरात मोठ्याप्रमाणवर लहान मोठे लघुउद्योजक आपले व्यवसाय करून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करून कामगारांचा व आपला उदरनिर्वाह करत होते. परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अचानकपणे बांधकाम निष्कासन कारवाई करण्याकरिता या परिसरात दहशतवादी व रोहिग्यांचे वास्तव्य आहे तसेच या ठिकाणापासून नदी प्रदूषण होत आहे. असे भासवून बांधकाम निष्कासन कारवाई करण्यात आली परंतु या ठिकाणी जवळपास सर्वच उद्योग हे इंजिनिअरिंगची कामे करत होते. या उद्योगापासून कोणत्याही प्रकारचे नदी प्रदूषण होत नव्हते, तसेच या ठिकाणी कोणीही दहशतवादी किंवा रोहिंगे सापडले नाही.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 12 जानेवारी 2025 पासून सदर बांधकामे 15 दिवसाची नोटिस मुदत देऊन स्वतः काढून घेण्यास सांगितले होते, परंतु इतक्या कमी वेळेत एवढा मोठा सेटअप हलविणे शक्य नव्हते.
. 8 फेब्रुवारी 2025 पासून सकाळी 6 वाजला सरसकट कारवाई चालू करण्यात आली. त्यामध्ये त्यांनी कंपनीमधील CNC, VMC मशीन, इतर मशीन, ऑफिस मधील रेकॉर्ड देखील काढून घेण्यास वेळ दिला नाही. वरील सर्व मशीनवर शॉपचा राडारोडा टाकून मशिनचे नुकसान करण्यात आले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने उद्योजकांच्या ७/१२ उताऱ्यावर असणारी जेवढी जागा आहे तेवढी औदयोगिक विकसित झोन निर्माण करून याच विकसित जागेत औद्योगिक पार्क करून बांधकाम सी. इ. पी. टी. एस. टी. पी. प्लांट, रोड, ड्रेनेज, एम. एस. इ. बी. पावर, पथदिवे, सहित तयार करून द्यावे ही संघटनेची प्रमुख मागणी आहे. कुदळवाडी, चिखली येथे झालेल्या निष्कासन कारवाई नंतर तेथील जागा मालकाना जागा विकासीत करण्यासाठी जमीन मोजणी करण्यासाठी अर्ज स्वीकारले जात नाही पिंपरी चिंचवड महानगरपालिका व भूमी अभिलेख यांच्यात समन्वयाचा अभाव आहे तो दूर करून जमीन मालकांना जागा विकसित करण्यासाठी महानगरपालिकेने सर्व मदत करावी
महानगरपालिकेने वरील परिसरात औद्योगिक पार्क बनवून उद्योजकांचे पुनर्वसन करून उद्योजकाचे झालेले आर्थिक नुकसान हे महानगरपालिकेने व राज्य शासनाने भरपाई करून द्यावे.
चिखली येथे महावितरण कडून निष्कासन कारवाई दरम्यान जप्त किवा बंद करण्यात आलेले वीज मिटर जोडणीसाठी दुप्पट सुरक्षा ठेव मागण्यात येत आहे . याबाबत उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी उपस्थित महावितरण अधिकाऱ्यांना दुप्पट सुरक्षा ठेव न घेण्याबाबत निर्देश दिले आहेत व तातडीने वीज मीटर बसवून देण्याचे आदेश दिले आहेत.या बैठकीला महावितरण मुख्य अभियंता सुनिल काकडे, अधिक्षक अभियंता श्री सिंहाजी गायकवाड, कार्यकारी अभियंता श्री अतुल देवकर उपस्थित होते.
अण्णा बनसोडे यांनी सकारात्मक भूमिका घेत जांभळे यांना अहवाल सादर करण्याचा आदेश देत उपमुख्यमंत्री अजित पवार, संघटना पधादीकारी,पालिका अधिकारी आणि शासनाचे नगरविकास विभागाचे अधिकारी यांच्या सोबत बैठक घेवून हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.