फक्त मुद्द्याचं!

29th March 2026
पिंपरी-चिंचवड

औद्योगिक क्रीडा असोसिएशनची ६२ वी सिंहगड चढण्याची स्पर्धा संपन्न!

औद्योगिक क्रीडा असोसिएशनची ६२ वी सिंहगड चढण्याची स्पर्धा संपन्न!

 एनप्रो कंपनीचे डेप्युटी एम डी अनुज करकरे ; ३१-४० च्या गटात प्रथम
  पिंपरी : औद्योगिक क्रीडा संघटनेच्या वतीने ॲटलास कॉपकोने आयोजित केलेली सिंहगड चढण्याची ६२ वी स्पर्धा उत्साहात पार पडली. सकाळी साडेसात वाजता आतकरवाडी पासून सुरू झालेली ही स्पर्धा गडावरच्या पार्किंग क्षेत्रामध्ये संपन्न झाली.

viara vcc
viara vcc

  ॲटलास कॉपकोच्या वतीने आयोजित केलेल्या या स्पर्धेत २१ कंपन्यांच्या एकूण २४७ खेळाडूंनी भाग घेतला.”छत्रपती शिवाजीमहाराज की जय” घोषणा देत हे सर्व खेळाडू अत्यंत उत्साहात या स्पर्धेमध्ये सामील झाले. छत्रपती शिवाजी महाराज की जय ,धर्मवीर संभाजी महाराज की जय अशा घोषणा देत सर्व स्पर्धक-मावळे सिंहगड चढत होते. थंडी असून सुद्धा खेळाडू अत्यंत उत्साहाने या स्पर्धेत सामील झाले होते या स्पर्धेस पुरुष आणि महिला खेळाडूंचा अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.ही स्पर्धा वय गट १८-३०,३१-४०,४१-५०,५१-६० व महिला खुला गट अश्या एकूण ५ गटांमध्ये घेण्यात आली.

.पारितोषक वितरण अमरदीप सिसोदिया (जनरल मॅनेजर,ॲटलास कॉपको व ॲटलास कॉपको स्पोर्ट्स क्लबचे प्रेसिडेंट), प्रवीणकुमार फटांगरे (ॲटलास कॉपको चाकण प्लांट हेड), वैभव शेळके (ॲटलास कॉपको तळेगाव प्लांट हेड), दयानंद प्रक्षाळे (सेक्रेटरी,ॲटलास कॉपको स्पोर्ट्स क्लब) तुषार थोरात (उपाध्यक्ष ॲटलास कॉपको स्पोर्ट्स क्लब), सदस्य संग्राम जगताप, अनुज करकरे (डेप्युटी एम डी, एनप्रो कंपनी) अतुल अहिरे (डीजीएम एचआर टाटा मोटर्स), शशिकांत कात्रे (टाटा मोटर्स स्पोर्ट्स कमिटी चेअरमन) नरेंद्र कदम (उपाध्यक्ष औद्योगिक क्रीडा संघटना) सचिव,वसंत ठोंबरे यांच्या हस्ते झाले.

पारितोषिक वितरणसमयी प्रदिप वाघ, हरी देशपांडे, विजय हिंगे, नितीन कदम, अमित कदम, मंदार कुलकर्णी उपस्थित होते. सुदर्शन आहेर यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मदत केली. या स्पर्धेतील खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी ॲटलास कॉपकोने रुग्णवाहीकेची खास सोय केली होती. याच स्पर्धेत एनप्रो कंपनीचे डेप्युटी एम डी अनुज करकरे यांनी भाग घेवून, ३१-४० च्या गटात प्रथम पारितोषिक मिळविले.
या पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन स्वप्निल ब्राह्मणकर व आभारप्रदर्शन संदीप काळे (खजिनदार ॲटलास कॉपको स्पोर्ट्स कमिटी)यांनी केले

 औद्योगिक क्रीडा संघटनेच्या स्पर्धेचे निकाल खालील प्रमाणे
१)वय गट १८-३०:-१)महेश सत्वसे(टाटा मोटर्स)३२.३५मि,२)अंकित गौतम(टाटा मोटर्स)३२.४८मि,३)कृष्णात घुरके (थायसन कृप)३६.५०मि
२)वय गट ३१-४०:-१)अनुज करकरे(एंप्रो)३०मि,२)विक्रम खरात(टाटा मोटर्स)३०.५८मि,३) उमेश पाटील(टाटा मोटर्स)३४.५०मि
3)वय गट ४१-५०: -१) उत्तम भोसले (टाटा मोटर्स)३६.३१मि,२) स्नेहल माने (टाटा मोटर्स)३८.०७ मि,३) वसंत रहाणे (ॲटलास कॉपको)४५.२० मि
 ४)वय गट ५१-ते६०:-१)आनंदा जुनघरे(टाटा मोटर्स)३२.५२मि,२)विद्याधर राणे(टाटा मोटर्स)३३.४८मि,३) महादेव पाटील(टाटा मोटर्स)३५.२मि
५)महिला खुला गट:-१) प्रियांका गुजर (टाटा मोटर्स) ४५.२१ २) शितल होडाबादकर(टाटा मोटर्स)४८.०४मि,3) स्निग्धा शर्मा (टीकेआयएल (६९.०२मि)

ॲटलास कॉपकोच्या आंतर विभागीय स्पर्धेचे निकाल खालील प्रमाणे
१)वय गट १८-३०:-१) गिरीश बस्तवाडकर ४०.३८ मी२)आकाश राजोळे ४४.१५ मी ३)विशाल ढोले ४४.३० मी
२)वय गट ३१-४०:-१) पराग खेडीकर ३४.५९ मी २)वैभव शेळके ४२.४५ मी ३)सोमनाथ गायकवाड ५७.४५ मी
3)वय गट ४१-५०: -१) वसंत रहाणे ४५.२० मी,२) सागर भगत ५५.३५ मी,३) दीपक फाळके ६९.०२मी
४)वय गट ५१-ते६०:-१)अशोक पाटील ३९.५० मी,२)विनायक पवार ४८.४५ मी,३)विजय साबळे ५१.१३ मी
५)महिला खुला गट:-१) वैष्णवी शिंदे ६९.५५ मी,२) मृणाली देशपांडे ७६.२४ मी,३) रिया परदेशी ७८.४२ मी

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"