राष्ट्रीय योगासन स्पर्धेचा निकाल जाहीर

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : केरळ योगा असोसिएशन व केरळ राज्य क्रीडा परिषद यांच्यावतीने ४९ व्या सिनियर राष्ट्रीय योगासन स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
भारतीतून २८ राज्यांच्या संघांमधून ६४८ स्पर्धकांनी यात भाग घेतला. केरळचे मुख्यमंत्री पिन्एराई विजयन, क्रीडामंत्री अब्दुरहिमान आणि योगा फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष इंदु अशोक कुमार अगरवाल यांच्या हस्ते झाले. आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक विजेते चंद्रकांत पांगारे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील एकूण ३८ स्पर्धक सहभागी झाले होते.
महाराष्ट्राचा अजिंक्य शिंदे याने १८ ते ३५ वयोगट (सिनियर) यामध्ये आर्टिस्टिक सोलो या प्रकारात आणि राखी गुगळे यांनी (४५ वर्षे पुढील महिला) या गटामध्ये ट्रॅडिशनल योगा या प्रकारात सुवर्ण पदक पटाकवले. विजेत्या स्पर्धकांचा पुणे डिस्ट्रिक्ट योगा अंड फिटनेस इन्स्टिट्यूट व प्राणा च्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महाराष्ट्रातील खेळाडूंचा निकाल पुढील प्रमाणे –
अजिंक्य शिंदे (१८ ते ३५ पुरुष) – आर्टिस्टिक सोलो – प्रथम
रुचिता वल्पा (१८ ते ३५ महिला) – आर्टिस्टिक सोलो – तृतीय
योगेश्वर सानप (३५ ते ४५ पुरूष) – ट्रॅडिशनल योगा – द्वितीय
सीमा पवार (३० ते ३५ महिला) – ट्रॅडिशनल योगा – तृतीय
रमा झा (३५ ते ४५ महिला) – ट्रॅडिशनल योगा – तृतीय
राखी गुगळे (४५ पुढील महिला) – ट्रॅडिशनल योगा – प्रथम
संगीता नाष्टा (४५ पुढील महिला) – ट्रॅडिशनल योगा – द्वितीय
अमोल म्हस्के – प्रोफेशनल योगा – ट्रॅडिशनल योगा – द्वितीय