टेम्पो चालकाने 10 लाख 54 हजार रुपये किंमतीच्या फिनोलेक्स केबलचा केला अपहार!

पिंपरी : धनंजय रोडवेज प्रायव्हेट लिमिटेड ट्रान्सपोर्ट कंपनीत आयसर टेम्पोंवर चालक असलेल्या व्यक्तीने 5 मे ते 6 मे या दरम्यान दहा लाख 54 हजार 929 रुपये किंमतीच्या फिनोलेक्स कंपनी केबल बॉक्स मालाचा अपहार करून फसवणूक केली. ही घटना 5 मे ते 7 मे या कालावधीत ट्रान्सपोर्ट नगर निगडी ते देवकरन मेशन्स, विठ्ठलदास रोड, मुंबई येथे घडली.
याप्रकरणी विजय अशोकराव कुऱ्हे (वय 38, रा. भोसले पगारिया टाॅवर, फ्लॅट नंबर 108, टॉवर दोन, फुगेवाडी, मूळ- रा. ता .जि. परभणी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अविनाश विजय चव्हाण (वय 32, राज शुभम पार्क, वराळे, ता. खेड ,मूळ रा- वार्ड नंबर एक, गायखेड, ता. लोणार, जि. बुलढाणा) यांच्या विरुद्ध निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अविनाश चव्हाण हा धनंजय रोडवेज प्रायव्हेट लिमिटेड ट्रान्सपोर्ट कंपनीत आयसर टेम्पो चालक म्हणून नोकरीस होता. पाच मे ते सहा मे या कालावधीत ट्रान्सपोर्ट नगर निगडी ते 32 / 8 देवकरण मेन्शन, विठ्ठलदास रोड ,लोहार चाळ, फोर्ट मुंबई येथे आयशर टेम्पो एम एच 14/ के क्यू/ 34 74 मधून 10 लाख 54 हजार 929 रुपये किंमतीच्या फिनोलेक्स कंपनी केबलचे बॉक्स मालाचा अपहार केला. आयशर

तडीपार आदेशाचे उल्लंघन; गुंडास अटक!
पिंपरी : तडीपार आदेशाचे उल्लंघन करून हद्दीमध्ये विनापरवाना प्रवेश केल्याने आणि घातक शस्त्र जवळ बाळगणे प्रतिबंधित असताना लोखंडी कोयता जवळ बाळगल्याने तडीपार गुन्हेगारास अटक करण्यात आली. ही कारवाई सोमवार 15 जून रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास गांधीनगर झोपडपट्टी पिंपरी येथे करण्यात आली.
याप्रकरणी संदेश रमेश देशमुख पोलीस कॉन्स्टेबल, गुन्हे शाखा युनिट एक यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. विजय उर्फ बंटी बाबुराव कांबळे (रा. गांधीनगर झोपडपट्टी, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस उपायुक्त परिमंडळ एक यांनी आरोपी विजय कांबळे यास पुणे जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार केले आहे. त्याने महाराष्ट्र शासन किंवा पोलीस उपायुक्त परिमंडळ एक यांची कोणतीही परवानगी न घेता तडेपारीचा आदेश धुडकावून पिंपरी चिंचवड हिंदीमध्ये प्रवेश केला. याशिवाय शहरात घातक शस्त्र बाळगण्यास प्रतिबंध असताना लोखंडी कोयता हे शस्त्र अवैधरित्या जवळ बाळगले. संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याचे जठर हे तपास करत आहेत.

