फक्त मुद्द्याचं!

5th February 2026
गुन्हेगारी

टेम्पो चालकाला मारहाण करून लुटले!

टेम्पो चालकाला मारहाण करून लुटले!

पिंपरी : टेम्पो चालकाला मारहाण करून लुटल्याची घटना समोर आली आहे, ही घटना शुक्रवार 12 सप्टेंबर पहाटेच्या सुमारास जनता सहकारी बँकेसमोर जुना जकात नाका चिंचवड येथे घडली .याप्रकरणी प्रकाश नागनाथ मिसाळ (वय 55) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी माऊली दिनेश शिंदे ,आदित्य किशोर आरणे आणि रोशन खंडू बल्लाळ सर्वजण वेताळ नगर झोपडपट्टी चिंचवड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे . यापैकी माऊली शिंदे याला अटक करण्यात आली आहे .पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी त्यांचा टेम्पो पोर्कींग करून गाडीच्या मागील बाजूला झोपले होते. त्यावेळी त्यांच्या ओळखीच्या आरोपींनी टेम्पोत येऊन त्यांना खाली ओढले .आरोपी माऊली शिंदे यांनी फिर्यादीच्या पॅंटच्या खिशात हात घालून बाराशे रुपये रोख काढून घेतले आणि आणखी पैसे आहेत का असे विचारले .तिघांनी मिळून त्यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली आणि टेम्पोची काचही फोडली. फिर्यादीने मदतीसाठी ओरडल्यावर आरोपी माऊली चिडून मी इथला भाई आहे तू मला ओळखत नाहीस का असे म्हणाला. त्यानंतर त्याने लाकडी दांडके आदित्य आरणे यांच्या हातात देऊन टेम्पो ट्रॅव्हलची काच फोडली .चिंचवड पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

viara vcc
viara vcc
Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"