फक्त मुद्द्याचं!

5th September 2025
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड महापालिकेची ऐतिहासिक कामगिरी ; ५२२ कोटींची कर वसुली!

पिंपरी चिंचवड महापालिकेची ऐतिहासिक कामगिरी ; ५२२ कोटींची कर वसुली!

पहिल्या तिमाहीत ४ लाख १२ हजार मालमत्ताधारकांनी जमा केला कर ; सर्वाधिक कर वाकड- 102 कोटी

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या तिमाहीमध्ये म्हणजेच अवघ्या ९० दिवसांमध्ये तब्बल ५२२ कोटी ७२ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच पहिल्या तिमाहीत कर वसुलीचा पाचशे कोटींचा आकडा पार करून ऐतिहासिक कामगिरी महापालिकेने केली आहे. पहिल्या तिमाहीत नागरिकांनी जास्तीतजास्त मालमत्ता कर भरावा, यासाठी कर संकलन विभागाने ३० जून २०२५ पर्यंत विविध सवलती जाहीर केल्या होत्या. या सवलतींना भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे शहरातील नागरिकांचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आभार मानले आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिकेने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ९६६ कोटींची मालमत्ता कर वसुली केली होती. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये हा आकडा पार करण्यासाठी महापालिकेने सुरुवातीपासून नियोजन केले आहे. पहिल्या तिमाहीमध्येच जास्तीतजास्त कर वसूल व्हावा, यासाठी ३० जून २०२५ पर्यंत ऑनलाइन कर भरणाऱ्यांना सामान्य करावर १० टक्के सवलत देण्यासह विविध सवलती महापालिकेने जाहीर केल्या होत्या. या सवलतींना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. १ एप्रिल २०२५ ते ३० जून २०२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच तिमाहीत तब्बल ४ लाख १२ हजार मालमत्ताधारकांनी कर भरून विविध सवलतींचा लाभ घेतला आहे.

viarasmall
viarasmall

गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत विक्रमी प्रतिसाद : आर्थिक वर्ष २०२१-२२ ते आर्थिक वर्ष २०२५-२६ या पाच आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत होणाऱ्या कर संकलनाची आकडेवारी पाहता यंदाच्या वर्षी पहिल्या तिमाहीत कर संकलनात विक्रमी वाढ दिसून आली आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये पहिल्या तिमाहीत १७१.८५ कोटी रुपये, आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये २५३.६५ कोटी रुपये, आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये पहिल्या तिमाहीत ४५४ कोटी रुपये तर २०२४-२५ मध्ये पहिल्या तिमाहीत ४४० कोटी रुपयांची कर वसुली झाली होती. यंदा मात्र ३० जून २०२५ पर्यंत ५२२ कोटी ७२ लाखांची वसुली झाली आहे.

सवलतीचा लाभ घेतलेले मालमत्ताधारक (एकूण लाभार्थी संख्या) : महिला मालमत्ताधारक: १७ हजार ४५९, माजी सैनिक: ४ हजार २३, दिव्यांग मालमत्ताधारक: १ हजार ८९७, शौर्यपदधारक: ९, पर्यावरणपूरक मालमत्ता: २४ हजार ८६९, आगाऊ भरणा : ४० हजार ९३४, ऑनलाइन कर भरणा करणारे: ३ लाख २३ हजार २३९, एकूण लाभार्थी संख्या : ४ लाख १२ हजार ४३०

वर्षनिहाय पहिल्या तिमाहीतील मिळकत कर संकलन ( कोटीत) : २०२१-२२ – ₹ १७१.८५ कोटी, २०२२-२३ – ₹ २५३.६५ कोटी, २०२३-२४ – ₹ ४५४.४३ कोटी, २०२४-२५ – ₹ ४४०.३२ कोटी, २०२५-२६ – ₹ ५२२.७२ कोटी (विक्रम)

विभाग कार्यालयानिहाय झालेले कर संकलन : वाकड – ६५ कोटी ११ लाख , थेरगाव – ४७ कोटी ५२ लाख ,चिखली – ३९ कोटी ३५ लाख ,कास्पटे वस्ती – ३७ कोटी ६० लाख , किवळे – ३४ कोटी २३ लाख , भोसरी – ३३ कोटी ९५ लाख , चिंचवड – ३३ कोटी ३ लाख , पिंपरी वाघेरे – ३२ कोटी ८४ लाख , मोशी – ३० कोटी ५३ लाख , सांगवी – २७ कोटी ९ लाख , मनपा भवन – २८ कोटी २२ लाख , आकुर्डी – २४ कोटी ३३ लाख , फुगेवाडी दापोडी – १८ कोटी ४९ लाख , चऱ्होली – १६ कोटी ३७ लाख , निगडी प्राधिकरण – १२ कोटी ७७ लाख, तळवडे – १२ कोटी ९० लाख , दिघी बोपखेल – १७ कोटी ८४ लाख , पिंपरी नगर – ४ कोटी २४ लाख

कर संकलनाची वैशिष्ट्ये : महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देताना ३ लाख २३ हजार २३९ नागरिकांनी तब्बल ३८० कोटींपेक्षा जास्त कर ऑनलाइन पद्धतीने भरला आहे. ही संख्या जवळपास एकूण कर भरणाऱ्यांच्या तुलनेत ७३ टक्के आहे, १८ विभागीय कार्यालयांच्या कॅश काऊंटरद्वारे तब्बल ३० कोटी ६३ लाख रुपयांचा कर भरणा केला आहे, ३० जून २०२५ या एका दिवसात ३४ कोटी ४९ लाख रुपयांचा भरणा झाला, पहिल्या तिमाहीत ऑनलाइनद्वारे ३८० कोटी ४८ लाख रुपये, रोख स्वरुपात ३० कोटी ६३ लाख, धनादेशाद्वारे २३ कोटी ६६ लाख आरटीजीएसद्वीरे २३ कोटी ५३ लाख मालमत्ता भरण्यात आला आहे.

सीएचडीसी प्रकल्पामुळे कर आकारणीमध्ये सुलभता, पारदर्शकता आणि गतिमानता आणणे सहज शक्य झाले. याद्वारे करवसुली, थकबाकीदारांच्या माहितीचे विश्लेषण होऊन वस्तुस्थिती समोर आली. करसंकलन विभागाने ‘डेटा’ विश्लेषण करून त्यानुसार एसएमएस, टेलिकॉलिंग, होर्डिंग, सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"