सर्वसाधारण विजेतेपदाचा चषक टाटा मोटर्स कंपनीला!

औद्योगिक क्रीडा संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा व पारितोषिक वितरण समारंभ
पुणे छ औद्योगिक क्रीडा संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा व पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार, दिनांक ४ जुलै रोजी पीवायसी, हिंदू जिमखाना येथे पुणे येथे संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी टाटा मोटर्स ,बजाज ऑटो आकुर्डी, बजाज ऑटो चाकण, जेसीबी, टी थायसन कृप ,महिंद्रा अँड महिंद्रा, प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड ,थरमॅक्स , स्कोडा ओक्सवॅगन ,अमुनेशन फॅक्टरी, टीटीआयएल, फ्लीट गार्ड फिल्टर्स, फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स, टेट्रापॅक, पीसीएमसी वगैरे कंपन्यांचे क्रीडा प्रतिनिधी व खेळाडू उपस्थित होते. या वर्षी एकूण २०७ कंपन्यांच्या २२०० पेक्षा जास्त खेळाडूंनी (पुरुष व महिला) या स्पर्धांमधून भाग घेतला

या कार्यक्रमाच्या पारितोषिक वितरण समारंभाच्या वेळी बोलताना औद्योगिक क्रीडा संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र नागेशकर म्हणाले की कंपनीतील काम हे आपलं कर्तव्य आहे तरी खेळ हा छंद प्रत्येकाने जोपासला पाहिजे. औद्योगिक क्रीडा संघटनेच्या स्पर्धा,खेळाडूंसाठी एक उत्तम व्यासपीठ म्हणून आहेत.त्याचा सर्वांनी फायदा घ्यावा. तर प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना २४ वेळा “आयर्न मॅन” चा किताब जिंकणारे दशरथ जाधव म्हणाले की प्रत्येक व्यायाम प्रकारासाठी आपण वेळ हा काढू शकतो आणि “आयर्न मॅन” सारखे उच्च दर्जाचे पारितोषक मिळू शकतो पण त्यासाठी मनाची इच्छाशक्ती मात्र जोरदार हवी.कुठल्याही गोष्टीला सातत्याची जर जोड दिली तर यश हे आपल्या जवळ येते, आपले उद्दिष्ट साध्य होते असे ते म्हणाले.सर्व खेळाडू मित्रांच्या समोर बोलताना त्यांनी आयर्न मॅनच्या यशाचे गुढ उलगडून सांगितले तर याच प्रसंगी बोलताना प्राज इंडस्ट्रीजचे मिलिंद बावा म्हणाले की औद्योगिक क्रीडा संघटनेची ६१ वर्षाची ही परंपरा फार मोठी आहे. औद्योगिक क्रीडा संघटनेची पताका आपण सगळ्यांनी मिळून पुढे न्यायला हवी. आपल्याला औद्योगिक क्रीडा संघटनेचा हात बळकट करावयास हवा व अधिक त्यासाठी अधिकाधिक खेळाडूंनी महिला व पुरुष खेळाडूंनी या स्पर्धांमधून भाग घेतला पाहिजे.
याप्रसंगी वार्षिक सर्वसाधारण विजेतेपदाचा चषक टाटा मोटर्स लिमिटेड तर्फे प्रवीण तांबे व नितीन कदम तर उपविजेत्या पदाचा चषक बजाज ऑटो आकुर्डी तर्फे अतुल काळोखे यांनी स्वीकारला. याच प्रसंगी पेरू देशात वेटलिफ्टिंग जागतिक स्पर्धेमध्ये पंच म्हणून, औद्योगिक क्रीडा संघटनेचे खेळाडू व पंच असलेल्या प्रशांत बेंद्रे (टाटा मोटर्स) , भारतात व भारताबाहेर दुबई व सिंगापूर येथे शरीरसौष्ठव प्रकारांमध्ये सुवर्णपदक मिळविणाऱ्या विजयपॉल (स्कोडा वोक्सवॅगन) व समरसता साहित्य परिषदेने घेतलेल्या ” लोकमाताअहिल्यादेवी होळकर ” विष राज्य स्तरीय लेखन स्पर्धेत जिल्हा पातळीवर द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या प्रदीप वाघ यांचाही या प्रसंगी सत्कार करण्यात आला. याच प्रसंगी औद्योगिक क्रीडा संघटनेच्या स्पर्धा पुरस्कृत करणाऱ्या टाटा मोटर्स, बजाज ऑटो आकुर्डी, जेसीबी ,महिंद्रा अँड महिंद्रा, प्राज इंडस्ट्रीज, सँडविक एशिया, ॲटलास कॉपको ,एसकेएफ, फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स ,फॉरविया फॉरेशिया, अल्ट्रा कॉर्पोटेक या कंपन्यांचा सत्कार करण्यात आला.
या समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे दशरथ जाधव, प्राज इंडस्ट्रीजचे प्राज इंडस्ट्रीजचे महाव्यवस्थापक मिलिंद बावा, विजयकुमारन,औद्योगिक क्रीडा संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र नागेशकर,उपाध्यक्ष नरेंद्र कदम, सचिव वसंत ठोंबरे,खजिनदार प्रदीप वाघ, सहखजिनदार विजय हिंगे,स्पर्धा प्रमुख हरी देशपांडे, बालाजी नानिवडेकर, सिग्मा इलेक्ट्रिकलचे सुयोग फुलबडवे, टेट्रापॅकचे संतोष सोनटक्के. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे दत्ता गायकवाड, जेसीबीचे सचिन कांबळे, एसकेएफचे संतोष शिंदे,कौस्तुभ नाडगोंडे, अमित कदम,राहुल कापसे,दयानंद प्रक्षाले,दुष्यंत गायकवाड,श्रीनिवास मोरे,राहुल चावरिया मंदार कुलकर्णी हे उपस्थित होते.
या प्रसंगी सूत्रसंचालन मयुरेश कुलकर्णी,प्रास्ताविक नरेंद्र कदम यांनी,पाहुण्यांचे स्वागत विजय हिंगे व हरि देशपांडे यांनी तर आभार प्रदर्शन वसंत ठोंबरे यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे युट्युब प्रक्षेपण मंदार कुलकर्णी यांनी केले

