फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पुणे

तळेगाव -चाकण-शिक्रापूरसह या भागात होणार पाडापाडीची कारवाई!

तळेगाव -चाकण-शिक्रापूरसह या भागात होणार पाडापाडीची कारवाई!

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला(पीएमआरडीए) आली जाग
पुणे : पुणे शहराभोवती वाहतूक कोंडी होणाऱ्या विविध भागात पुढील ३० दिवसात राष्ट्रीय महामार्ग व राज्यमार्गाच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस अनधिकृत व अतिक्रमण केलेले दुकाने, गाळे, बांधकामे व इतर काही तात्पुरत्या स्वरूपाच्या बांधकामांवर सर्व विभागांनी संयुक्तपणे कारवाई करण्याचे निश्चित करण्यात आले. सर्व विभाग संयुक्त कारवाई करणार असून त्याचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले. संबंधित क्षेत्रातील महामार्ग व राज्यमार्ग रस्त्यालगतचे दुकाने, पत्राशेड, गाळे, टपरी व अनधिकृत बांधकामे स्वत:हून काढून घेण्याचे आवाहन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी स्थानिकांना करण्यात आले आहे.

पुणे शहराभोवती दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत असल्याने नागरिकांसह वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात विविध यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेत यात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

या बैठकीस अतिरिक्त पोलीस आयुक्त, पुणे शहर मनोज पाटील, सह आयुक्त दिप्ती सुर्यवंशी-पाटील, अधिक्षक भूमी अभिलेखच्या आशा जाधव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालक संजय कदम, पिंपरी चिंचवड मनपाचे शहर अभियंता मकरंद निकम, वाहतुक विभागाचे उपआयुक्त बापू बांगर आदी बैठकीला उपस्थित होते.

खालीलप्रमाणे कारवाईचे नियोजन

  • पुणे – सोलापूर रोड (हडपसर ते यवत, व उरूळीकांचन ते शिंदवणे) :- दि. ०३/०३/२०२५ ते १०/०३/२०२५
  • पुणे – नाशिक रोड (राजगुरूनगर) :- दि. ०३/०३/२०२५ ते १०/०३/२०२५
  • चांदणी चौक ते पौड :- दि. ०३/०३/२०२५ ते १०/०३/२०२५
  • पुणे-सातारा रोड (नवले ब्रिज ते सारोळे) :- दि. १०/०३/२०२५ ते २०/०३/२०२५
  • सुस रोड :- दि. १०/०३/२०२५ ते २०/०३/२०२५
  • हडपसर (शेवाळवाडी) ते दिवे घाट :- दि. १०/०३/२०२५ ते २०/०३/२०२५
  • नवलाख उंब्रे ते चाकण :- दि. १०/०३/२०२५ ते २०/०३/२०२५
  • हिंजवडी परिसर – माण :- दि. १०/०३/२०२५ ते २०/०३/२०२५
  • तळेगाव – चाकण – शिक्रापूर :- दि. १०/०३/२०२५ ते २०/०३/२०२५
Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"