राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे आमदार रोहित पवारांचे लाक्षणिक उपोषण!

पिंपरी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येतील तसतसे राजकीय पक्ष आपले अस्तित्व दाखवण्यासाठी प्रयत्नशील राहतील. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज सोमवार 20 ऑक्टोबर रोजी लाक्षणिक उपोषण केले .

यावेळी रोहित पवार यांनी सांगितले की, महायुतीमध्ये कोणताही अलबेल नाही .आगामी महापालिका निवडणुकीत महायुती एकला चलो ची भूमिका घेणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला ही कुणकुण लागली आहे. भाजपने दोघांना वेगळे लढण्यास सांगितले असून असे आदेश दिल्लीवरून भाजपला मिळाले असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले .2029 मध्ये भाजप देशात आपली ताकद तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. शिंदे शिवसेना आणि अजित पवार गटाचे काही आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील असे संकेतही त्यांनी दिले .पुण्याची ओळख ही सांस्कृतिक राजधानी अशी असताना महाराष्ट्रात गुन्हेगारीत आणि भ्रष्टाचारात अव्वल आली आहे. काही मोजक्या लोकांना महायुती सरकार सध्या पोसत असल्याचे त्यांनी सांगितले .

