डिजिटल आरेष्टची भीती दाखवून 10 लाख रुपयांची फसवणूक!

पिंपरी : अनोळखी व्यक्तींनी वेगवेगळ्या मोबाईल वरून व्हाट्सअप व व्हिडिओ कॉल करून स्वतःला टेलिकॉम, सीबीआय ,आरबीआय व पोलीस अधिकारी असल्याचे भासवून डिजिटल आरेस्टची भीती दाखवून बँकेच्या खात्यावर 10 लाख रुपये पाठवण्यास लावून आर्थिक फसवणूक केली. ही घटना 11 ते 16 सप्टेंबर 2026 दरम्यान रा. गट नंबर 1401, गणेश हाउसिंग सोसायटी, मोरे वस्ती, चिखली येथे घडली.

या प्रकरणी मनोज कुमार उपाध्याय (वय 59, रा. गट नंबर चौदाशे एक, गणेश हाउसिंग सोसायटी, मोरे वस्ती) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांना अनोळखी व्यक्तींनी वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून व्हाट्सअप व व्हिडिओ कॉल करून स्वतःला टेलिफोन, सीबीआय, आरबीआय व पोलीस अधिकारी असल्याचे भासवून डिजिटल आरेष्टची भीती दाखवली. बँकेचा अकाउंट नंबर पाठवून त्यावर 10 लाख रुपये भरण्यास भाग पाडले. फिर्यादीची दहा लाख रुपये आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जाधव व पोलीस उपनिरीक्षक शेख हे तपास करत आहेत.

