विद्यानंदच्या विद्यार्थ्यांनी केल्या पर्यावरणपूरक मूर्ती

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी: प्रदूषण मुक्त गणेशोत्सव हा उद्देश ठेवून पर्यावरण संवर्धन समिती, पिंपरी-चिंचवडच्या वतीने विद्यानंद भवन हायस्कूलमध्ये नुकतीच शाडू मातीचे गणपती मूर्ती बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली. त्यात मुलांनी कलेचे दर्शन घडविले.
विद्यानंद भवन हायस्कूलमध्ये येथे विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनेतून सुबक, सुंदर गणेश मूर्ती बनवल्या. सिकंदर घोडके यांनी पर्यावरण संरक्षण व जनजागृती, निर्माल्य दान, पर्यावरण पूरक सजावट यावर मार्गदर्शन केले. समितीचे सदस्य संगीता घोडके, मीनाक्षी मेरूकर, कल्पना तळेकर यांनी प्रात्यक्षिके करून दाखवली. या कार्यशाळा आयोजनासाठी सरोज सुलगेकर, विनया पाटील, रेश्मा कांबळे यांनी परिश्रम घेतले. या वेळी मुख्याध्यापक जगन सिरील,पर्यवेक्षिका मनीषा सुर्वे उपस्थित होते.