गायत्री इंग्लिश मीडियम स्कूलचे क्रीडा स्पर्धेत यश

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : गायत्री इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा आणि राज्य स्तरावर विविध क्रीडा स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळविले आहे.
अण्णासाहेब मगर स्टेडियम, नेहरूनगर, पिंपरी येथे झालेल्या १७ वर्षाखालील वेटलिफ्टिंग स्पर्धेत तस्लीम अन्सारी याने रौप्य पदक मिळविले आहे. १९ वर्षा खालील मुलींच्या स्पर्धेत भक्ती ठोंबरे हिने सुवर्ण पदक पटकावत विभागीय स्पर्धेसाठी खेळण्याचा मान मिळवला.
सौरव चांदगुडे याने १९ वर्षा खालील मुलांच्या स्पर्धेत रौप्य पदक मिळविले. या यशस्वी स्पर्धकांना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक समाधान माने यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे मानद संस्थापक अध्यक्ष विनायक भोंगाळे, सचिव संजय भोंगाळे, संचालिका कविता कडू पाटील व सरिता विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जोतिबा सुरवसे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पंचक्रोशी मध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.