फक्त मुद्द्याचं!

5th September 2025
पिंपरी-चिंचवड

महाराष्ट्रातील पहिल्या ‘संविधान भवन’च्या टप्पा दोन कामाला स्थायी समितीची मान्यता!

महाराष्ट्रातील पहिल्या ‘संविधान भवन’च्या टप्पा दोन कामाला स्थायी समितीची मान्यता!

भाजपा आमदार महेश लांडगे यांची संकल्पपूर्ती ; आंतरराष्ट्रीय दर्जाच्या लायब्ररीचे काम प्रगतीपथावर

पिंपरी : भारतीय राज्यघटना आणि जगभरातील लोकशाही देशांच्या घटनांचा अभ्यास करता यावा. भारतीय संविधानाबाबत प्रचार-प्रसार आणि जागृती करता यावी. यासाठी महाराष्ट्रातील पहिले संविधान भवन पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्याचे काम सुरू झाले आहे. त्याच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाला महानगरपालिका स्थायी समिती सभेत मान्यता देण्यात आली.

भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे यांनी 2017 मध्ये ‘‘भोसरी व्हीजन-2020’’ उपक्रम हाती घेतला. यामध्ये संविधान भवन आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची लायब्ररी उभारण्याचा संकल्प केला होता. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात संविधान भवनचे काम लांबणीवर पडले. 2022 मध्ये पुन्हा भाजपा महायुतीची सत्ता आल्यानंतर पहिल्या टप्प्यातील कामाचे भूमिपूजन 2023 मध्ये करण्यात आले. आता दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे १२० कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी दिली आहे.

viarasmall
viarasmall

शहरातील पेठ क्र. ११ येथील जागा क्र. २ क्षेत्र २५८९४.२० चौ. मीटर नियोजित प्रकल्पाच्या जागेत भव्य संविधान भवन उभारण्यात येत आहे. त्यामध्ये तळमजल्यावर एझिबिशन हॉल- ४, ऑडिओरिअम ३०० आसन क्षमता असणार आहे. पहिल्या मजल्यावर लायब्ररी हॉल-४, तसेच बेसमेंटमध्ये ३५० चारचाकी वाहने , १ हजार दुचाकी वाहने पार्किंग होतील इतक्या क्षमतेचे वाहनतळ असणार आहेत. त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक बाबींचा समावेश अंदाजपत्रकात केला आहे. याप्रकल्पासाठी केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाकडून प्रधानमंत्री जनविका कार्यक्रम अंतर्गत ५० कोटी रुपये आणि महाराष्ट्र राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विभागाकडून १५ कोटी रुपयांचे अनुदान मिळेल, असे अपेक्षीत आहे.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची, भारतीय संविधानाची नव्या पिढीमध्ये जागृती व्हावी. जगभरातील लोकशाही देशाच्या घटनांचा अभ्यास करता यावा. या करिता ‘‘संविधान भवन’’ उभारण्याचा संकल्प केला होता. पहिल्या टप्प्यातील काम सुरू झाले. दुसऱ्या टप्प्यातील कामाला आता गती मिळाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कालबद्ध नियोजन करुन हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. – महेश लांडगे, आमदार, भाजपा

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"