फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
पिंपरी-चिंचवड

खेळामधून आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू मिळतील : यश भोसले

खेळामधून आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू मिळतील : यश भोसले

 औद्योगिक क्रीडा संघटनेची ६२ वी बॅडमिंटन स्पर्धा
 पिंपरी : यावर्षी खेळाडूंचा प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे.;या खेळामधून आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू मिळतील असा विश्वास वाटतो असे मत अल्ट्रा कॉर्पोटेक प्रा. ली.चे डायरेक्टर श्री यश भोसले यांनी पारितोषक वितरण समारंभात व्यक्त केले. दीपक शेट्टी(एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर बिझनेस डेव्हलपमेंट), मनुष्यबळ विभागाचे अमित काळे, औद्योगिक क्रीडा संघटनेचे नरेंद्र कदम, वसंत ठोंबरे, विजय हिंगे,स्पर्धाप्रमुख हरी देशपांडे यांच्या हस्ते देखील पारितोषक वितरण करण्यात आले.

viara vcc
viara vcc

 दिनांक ०४ जानेवारी रोजी वेदांत स्पोर्ट्स अकॅडमी,ताथवडे येथे औद्योगिक क्रीडा संघटनेची ६२वी बॅडमिंटन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.दोन दिवस चाललेली ही स्पर्धा ” अल्ट्रा कॉर्पोटेक प्रा.ली.” तर्फे आयोजित करण्यात आली.स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी,पुढील फेऱ्याना वेदांत स्पोर्ट्स अकॅडमी,ताथवडे येथे सुरुवात झाली.

या स्पर्धेत अल्ट्राकॉर्पोटेक,टाटा मोटर्स,बजाज ऑटो आकुर्डी, बजाज ऑटो चाकण, मिंडा कॉर्पोरेशन,फिलिप्स, शिंडलेर्, ॲटलास कॉपको,टीई कनेक्टिव्हिटी,अटॉस,फॉर्विया,फ्लीटगार्ड फिल्टर्स,टाटा टेक्नॉलॉजी,एचडी हुंडई,इमर्सन इंडिया, टीकेआयएल,थिसेनकृप उधे,प्राज इंडस्ट्रीज,टीसीएस,एसकेएफ,थरमॅक्स,जेसीबी,दसॉल्ट सिस्टीम्स,अक्सेंचर,एनर्जी इन मोशन,सहाना इंजिनिअरिंग,कॉग्निजंट,ऑप्टिमायझर,वोस्टलपाईन,सँडविक एशिया,जेसीबी,इंडियन एअर फोर्स,हर्षल इंडस्ट्रीज,किर्लोस्करब्रदर्स,ओट्टर कंट्रोलस्,सँडविक एशिया,एनप्रो,हिंदुस्तान अँटिबायोटिक्स वगैरे ४१ कंपन्यांच्या ३६० महिला व पुरुष खेळाडूंनी पुरुष एकेरी,दुहेरी,महिला एकेरी,दुहेरी,प्रौढ एकेरी,दुहेरी व मिश्र दुहेरी अशा विविध गटामध्ये भाग घेतला.स्पर्धेचे आयोजन अल्ट्रा कॉर्पोटेक प्रा. ली.” तर्फे अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने केले.

या पारितोषक वितरण-समारंभ प्रारंभी प्रास्ताविक वसंत ठोंबरे, सूत्रसंचालन अँकर चेतन पाटील यांनी केले.सर्व विजेत्यांना करंडक व प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.समारंभाचे शेवटी औद्योगिक क्रीडा संघटनेचे प्रदीप वाघ यांनी स्पर्धेच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल अल्ट्रा कॉर्पोटेक प्रा. ली.चे आभार मानले .धीरज अधिकारी यांनीही सर्व सहभागी कंपन्यांचे व खेळाडूंचेआभार मानले.

ही स्पर्धा आयोजन यशस्वी होण्याचे श्रेय “अल्ट्रा कॉर्पोटेक प्रा.ली.”चे धीरज अधिकारी,आशिष भोसले,चीफ-रेफ्रि परबत कुंभार,अजित कुंभार व सहकारी यांच्याकडे जाते.त्यांना याकामी अल्ट्रा कॉर्पोटकचे अशोक भोसले, यश भोसले,यांचे मार्गदर्शन लाभले.आर्यन ट्रॉफी वर्ल्डचे अमित कदम, सँडविक एशिया स्पोर्ट्स कमिटीचे दुष्यंत गायकवाड, अजित कुंभार बॅडमिंटन अकॅडमीचे अजित कुंभार,परबत कुंभार सर,ज्येष्ठ खेळाडू भानुदास कुलकर्णी,सौरभ गवादे मंदार कुलकर्णी हे उपस्थित होते.

स्पर्धेचे निकाल खालील प्रमाणे
अंतिम फेरी
1) पुरुष एकेरी शंतनू डोके (कॉग्निजंट) विजयी अंतिम फेरी
शंतनू डोके (कॉग्निजंट) विजयी विरुद्ध सौरभ तिवारी (डसाल्ट सिस्टिम्स) (१५-७),(१७-१५)
2)अंतिम फेरी
कुणाल पाटणे व सौरभ तिवारी (डसाल्ट सिस्टिम्स) विजयी विरुद्ध माणिक गहलोत व राहुल पाटील (टीसीएस) )(१५-१३) )(१५-९)3) महिला एकेरी आदिती काळे (टीसीएस) विजयी
अंतिम फेरी
आदिती काळे (टीसीएस) विजयी विरुद्ध निष्ठा रॉय (बजाज ऑटो आकुर्डी) (१५-१) (१५-४)
4) महिला दुहेरी आदिती काळे व ऋतुजा तायडे (टीसीएस) विजयी
अंतिम फेरी
आदिती काळे व ऋतुजा तायडे (टीसीएस) विजयी विरुद्ध आकांक्षा दरगर व निष्ठा रॉय (बजाज ऑटो आकुर्डी) )(१५-७)(१५-४)
5) प्रौढ पुरुष एकेरी मनोज गुप्ता(ॲटलास कॉपको) विजयी
अंतिम फेरी
मनोज गुप्ता(ॲटलास कॉपको) विजयी विरुद्ध ललित पांडे (बजाज ऑटो) (१५-१२) (१५-८)
6) प्रौढ पुरुष दुहेरी मनोज गुप्ता व दिनेश कुमार सुब्रमण्यम (ॲटलास कॉपको) विजयी
अंतिम फेरी
मनोज गुप्ता व दिनेश कुमार सुब्रमण्यम (ॲटलास कॉपको) विजयी विरुद्ध केदार टांकसाळे व वीरेंद्र कुलकर्णी (टीकेआयएल) (१५-६) (१५-८)
7) मिश्र दुहेरी आदिती काळे व प्रणव पाटील (टीसीएस) विजयी
अंतिम फेरी
आदिती काळे व प्रणव पाटील (टीसीएस) विजयी विरुद्ध अनुराग वंगावल्लू व निष्ठा रॉय (बजाज ऑटो आकुर्डी) (१५-९) (१५-९)

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"