फक्त मुद्द्याचं!

15th April 2025
पिंपरी-चिंचवड

आमदार जगताप यांच्या संकल्पनेतून , पारंपरिक जोर-बैठक स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद!

आमदार जगताप यांच्या संकल्पनेतून , पारंपरिक जोर-बैठक स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद!

३४२ स्पर्धकांमधून झाली विजेत्यांची निवड, तीन मिनिटांत आर्यन मुळेने मारले 125 जोर
पिंपरी : पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष व आमदार शंकर जगताप यांच्या संकल्पनेतून शहरात प्रथमच पारंपरिक जोर-बैठक स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले. श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने आयोजित या स्पर्धेला नागरिक आणि तरुण वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. काळेवाडी येथील आरंभ बँक्वेट हॉलमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत तब्बल ३४२ स्पर्धकांनी सहभाग घेत आपली ताकद आणि कौशल्य दाखवले. आर्यन मुळे या खेळाडूने तीन मिनिटांत 125 जोर मारत स्पर्धेतील सर्वात जास्त जोर मारण्याचा विक्रम नोंदवला.

३ मिनिटांच्या निर्धारित वेळेत अधिकाधिक जोर-बैठका मारणाऱ्या स्पर्धकांना क्रमवारीनुसार रोख पारितोषिके आणि प्रमाणपत्र देण्यात आले.
विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे:
१० ते १५ वयोगट: – प्रथम क्रमांक: स्वराज लांडगे – ११७ जोर, द्वितीय क्रमांक: आदित्य मोरे – १०२ जोर, तृतीय क्रमांक: विराज कनोजिया – ९४ जोर
१५ ते २० वयोगट: -प्रथम क्रमांक: आर्यन मुळे – १२५ जोर, द्वितीय क्रमांक: शरमन शिंदे – १२२ जोर, तृतीय क्रमांक: विश्वजीत हवलदार – १०८ जोर
२० ते २५ वयोगट: प्रथम क्रमांक: जय शेलार – ११८ जोर, द्वितीय क्रमांक: सुमित कदम – ११५ जोर, -तृतीय क्रमांक: यश वाघ – ११२ जोर
स्पर्धेच्या माध्यमातून भारतीय परंपरेला नवे बळ

आमदार शंकर जगताप यांची ही संकल्पना फक्त एक स्पर्धा न राहता, तरुणांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणारा आणि पारंपरिक व्यायाम पद्धतीचे महत्त्व अधोरेखित करणारा उपक्रम ठरला. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी पैलवान काळूराम नढे, आकाश भारती आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

viara ad
viara ad

उपस्थित मान्यवरांनी केले खेळाडूंचे कौतुक
या स्पर्धेला माजी नगरसेवक विनोद नढे, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पैलवान काळूराम नढे, देशपांडे सर, सुरेश भोईर, देविदास पाटील, ज्योती भारती, ललिता पाटील, दिपाली कलापुरे , सोमनाथ भोंडवे, हभप शारदाताई मुंडे, नरेश खुळे, रमेश काळे, प्रमोद मोरे, राजू शिंदे, युवराज नढे, नेताजी नखाते, धनाजी नखाते, किशोर नखाते, विजय गावडे, सोमनाथ तापकीर, प्रवीण मोहिते, दत्ता नढे, अतुल नढे, पंकज मिश्र, आकाश भारती, सुखलाल भारती, मेजर उमंदीकर, अशोक भोंडवे आदी मान्यवर उपस्थित होते.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"