फक्त मुद्द्याचं!

22nd March 2026
पिंपरी-चिंचवड

जड अवजड वाहनांची वेग मर्यादा 30 किलोमीटर ; वाहतूक पोलिसांचे आदेश

जड अवजड वाहनांची वेग मर्यादा 30 किलोमीटर ; वाहतूक पोलिसांचे आदेश

 पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील जड अवजड वाहनांवर मर्यादा
 पिंपरी : अपघातांचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी आणि वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तलयाच्या कक्षेतील महामार्ग वगळून महामार्गाच्या सेवा रस्ता आणि अंतर्गत रस्त्यावरून जड अवजड वाहनांचा वेग प्रती तास 30 किलोमीटर ठेवण्याचे आदेश वाहतूक पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी आज बुधवार तीन डिसेंबर पासून लागू केला आहे.

viara vcc
viara vcc

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील अपघातांचे प्रमाण अवलोकन केले असता जड वाहनांच्या वेगामुळे वारंवार अपघात होतात त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडते यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहनांचा वेग मर्यादित ठेवणे गरजेचे असल्याने आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी व वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी जड अवजड वाहनांचा वेग प्रती तास 30 किलोमीटर ठेवण्याचे आदेश वाहतुक पोलिसांनी काढले आहेत .मोटर वाहन कायदा कलम 115 116 (एक) (ए )(बी) 116 (4) आणि 112 (2 )अन्वये वाहतूक पोलिसांना अधिकार प्राप्त झाले आहेत. त्यानुसार जड अवजड वाहनांची मर्यादा कमी करण्यात आली आहे. शहरात अत्यावश्यक जड – अवजड वाहनांना यातून वगळण्यात आले आहे .याची दखल जड- अवजड वाहनधारक, वाहन चालक यांनी घ्यावी असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"