फक्त मुद्द्याचं!

7th September 2025
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये ‘स्पंदन’ उपक्रमाची सुरुवात!

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये ‘स्पंदन’ उपक्रमाची सुरुवात!

६० हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना जीवन कौशल्य शिक्षणाचा लाभ मिळणार
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत कौशल्यांचा विकास व्हावा यासाठी ‘स्पंदन’ उपक्रम सुरू केला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हा उपक्रम यशस्वी ठरण्याच्या दृष्टीने नियोजनही करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये विचारशक्ती आणि निर्णय क्षमतेसारखी मूलभूत जीवन कौशल्य प्रमाण जाणून घेण्यासाठी ‘क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया’ (QCI) द्वारे मूल्यमापन करण्यात आले. या मूल्यमापनातून असे दिसून आले की, महापालिकेच्या केवळ १२ टक्के विद्यार्थ्यांनी निर्णय घेण्याशी संबंधित प्रश्नांची योग्य उत्तरे दिली. तर ४२ टक्के पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना स्व-जागरूकता, गंभीर विचार आणि निर्णय घेणे यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये उत्तरे देण्यात अडचणी आल्या. यामुळेच महापालिकेच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत कौशल्यांचा विकास व्हावा यासाठी ‘स्पंदन’ सारखा उपक्रम सुरू केला आहे.

viara vcc
viara vcc

सदर उपक्रम वाचन आणि गणिताबरोबरच मुलांचा भावनिक विकास करण्यावर लक्ष केंद्रित करतो. ‘स्पंदन’ उपक्रम सर्व १४० महापालिका शाळा आणि २११ बालवाड्यांमध्ये सुरू करण्यात येत आहे, ज्यामुळे पूर्व-प्राथमिक ते इयत्ता १० वी पर्यंतच्या ६० हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये ‘सामाजिक-भावनिक आणि नैतिक शिक्षण व जीवन कौशल्यांची रुची वाढेल’ असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

स्पंदन उपक्रमासाठी २१ शिक्षकांची निवड!
विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी महापालिकेने सहानुभूती, संवाद कौशल्य, विचारपूर्वक निर्णय क्षमता आणि समग्र शिक्षणाची जाणीव अशा महत्त्वाच्या गुणांवर लक्ष केंद्रित करत २१ शिक्षकांची निवड केली आहे. हे शिक्षक आता “एसईई लाईफ स्किल्स मास्टर ट्रेनर्स” म्हणून ओळखले जातात आणि ते इतर शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष प्रशिक्षण घेत आहेत. नुकताच

ज्ञान प्रबोधिनी येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणामध्ये मास्टर ट्रेनर्सनी सहभाग नोंदवला. यावेळी त्यांनी शाळेत विद्यार्थी व शिक्षक हे सामाजिक भावनिक शिक्षण (एसईएल) चा सराव करण्याबाबतचे प्रशिक्षण घेताना त्याबाबतीत अनुभव घेतला. मास्टर ट्रेनर्सनी विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधून, विद्यार्थ्यांना निर्णय क्षमता, स्वावलंबन यांसारख्या प्रमुख एसईएल कौशल्यांचा विकास करण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी एका मास्टर ट्रेनरने सांगितले की, “आज मला सामाजिक आणि भावनिक विकासाशी संबंधित अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. यामध्ये आत्म-जागरूकता, सामाजिक जागरूकता, ताण व्यवस्थापन आणि पंचकोशाची संकल्पना समजली.”

विविध उपक्रमांचे आयोजन!
बालवाडी ते ५ वी पर्यंतच्या वर्गातील शिक्षकांसाठीचे प्रशिक्षण आधीच सुरू झाले असून, वर्षभर मासिक शिक्षक समूह सत्रांचे आयोजन केले जाणार आहे. यामुळे संपूर्ण शालेय शिक्षण पद्धतीमध्ये सकारात्मक बदल होण्यास मदत होईल. हा अभ्यासक्रम स्वतःच विद्यार्थ्यांसाठी खूप आकर्षक आहे. विद्यार्थ्यांना भावनिक जाणीव, कृतज्ञता आणि सामाजिक नातेसंबंध मजबूत करण्यासाठी “माइंडफुल सोमवार”, “थँक्सफुल गुरुवार” आणि “फ्रेंडली शुक्रवार” असे उपक्रम राबवले जाणार आहेत.
स्पंदन हा एक सामाजिक-भावनिक व नैतिक शिक्षण (SEE Learning) कार्यक्रम आहे, जो CASEL, UNICEF आणि SEE शिक्षण फ्रेमवर्कवर आधारित आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"