फक्त मुद्द्याचं!

11th February 2026
पिंपरी-चिंचवड

घरबसल्या भरता येणार झोपडपट्टी सेवाकर!

घरबसल्या भरता येणार झोपडपट्टी सेवाकर!

महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाची ऑनलाईन सुविधा उपलब्ध
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागामार्फत आता सेवाकर घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. क्युआर कोडद्वारे सहज व सुरक्षितपणे सेवाकर भरणे शक्य झाल्याने नागरिकांचा वेळ व श्रम वाचणार असून डिजिटल सेवांकडे महापालिकेचा आणखी एक प्रभावी टप्पा पूर्ण झाला आहे. तरी नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन लवकरात लवकर सेवाकराचा भरणा करावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

viara vcc
viara vcc

झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागामार्फत राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत ‘सारथी सोनचीरैया’ शहर उपजीविका केंद्राशी संलग्न व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या महिला बचत गटांच्या प्रतिनिधींमार्फत झोपडपट्टीवासियांना सेवाकर बिलांचे वितरण करण्यात आले आहे. हे बिल भरण्याची ऑनलाईन सुविधा देखील सुरू करण्यात आली आहे.

सेवाकर बिलाच्या खालच्या उजव्या बाजूस एक क्युआर कोड (QR Code) देण्यात आला आहे. हा क्युआर कोड स्कॅन करून ऑनलाईन स्वरूपात सेवाकर बिलाचा भरणा करता येणार आहे. तरी या सुविधेचा लाभ घेऊन सेवाकर भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

असा भरा ऑनलाईन सेवाकर
•ज्या नागरिकांना महापालिकेकडून बिल मिळाले आहे, ते नागरिक सदर बिलाचा भरणा घरबसल्या ऑनलाईन करू शकतात.
•तुम्हाला मिळालेल्या बिलाच्या खालच्या उजव्या बाजूस दिलेला क्युआर कोड (QR Code) मोबाईलद्वारे स्कॅन करा.
•क्युआर कोड स्कॅन केल्यानंतर तुमचे नाव व बिलासंबंधी इतर संबंधित माहिती स्क्रीनवर दिसेल. कृपया माहिती तपासून घ्या.
•माहिती योग्य असल्याची खात्री झाल्यानंतर, त्याखालील “Pay Bill Here” या बटणावर क्लिक करा.
•UPI / Credit Card / Debit Card / Net Banking / Digital Wallet यांपैकी कोणत्याही पर्यायाचा वापर करून बिलाचा भरणा पूर्ण करा.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सेवांमध्ये पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल सोयी वाढविणे हे आमचे प्राधान्य आहे. सेवाकर ऑनलाईन भरण्याच्या सुविधेमुळे झोपडपट्टीवासियांना घरबसल्या कर भरणे शक्य होणार असून नागरिकांनी या सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा. -रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महापालिका

सेवाकर बिलावर देण्यात आलेल्या क्युआर कोडद्वारे काही सेकंदांत ऑनलाईन भरणा करता येणार आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून बिलांचे वितरण करून नागरिकांपर्यंत ही सुविधा प्रभावीपणे पोहोचविण्यात आली असून, सर्व लाभार्थ्यांनी वेळेत सेवाकर भरणा करावा.-अण्णा बोदडे, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"