फक्त मुद्द्याचं!

19th April 2025
पिंपरी-चिंचवड मनोरंजन

श्रुती उबाळेला शासनाचा अभिनयातील पदार्पण पुरस्कार

श्रुती उबाळेला शासनाचा अभिनयातील पदार्पण पुरस्कार

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : थेरगाव येथील श्रुती दत्तात्रेय उबाळे हिला भ्रमणध्वनी या चित्रपटातील भूमिकेबद्दल राज्य सरकारचा उत्कृष्ट प्रथम पदार्पण पुरस्कार मिळाला आहे. दिवंगत अभिनेत्री रंजना देशमुख यांच्या नावाने हा पुरस्कार असून आज (बुधवारी) मुंबई येथे पुरस्कारांचे वितरण झाले. मात्र, तिला पुरस्कार जाहीर झाल्याचे शासनाकडून कळविण्यातच आले नसल्याने ती या सोहळ्यास उपस्थित राहू शकली नाही.

महेंद्र त्रिपाठी निर्मित आणि दिग्दर्शित भ्रमणध्वनी या चित्रपटात श्रुती हिची प्रमुख भूमिका आहे. तिने आतापर्यंत जांभूळ, तिरसाट अशा दोन चित्रपटांतून काम केले आहे. अभिनायासाठी कुठलेही विशेष प्रशिक्षण घेतलेले नाही. वडिल दत्तात्रेय उबाळे यांच्याकडून मी सर्व धडे घेतले, असे ती सांगते. दत्तात्रेय उबाळे हे नावाजलेले अभिनेते आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांतून काम केले आहे. पिपाणी हा त्यांचा गाजलेला चित्रपट. मिसेस मुख्यमंत्री, तुला पाहते रे, संत ज्ञानेश्वर माऊली, आप्पी आमची कलेक्टर, लाखात एक आमचा दादा आदी मालिकांतूनही दत्तात्रेय उबाळे यांनी काम केले आहे. भ्रमणध्वनी या चित्रपटातही श्रुती हिचे शिक्षक म्हणून दत्ता उबाळे यांची भूमिका आहे. मोबाईलच्या वापरावर आधारीत वास्तवदर्शी हा चित्रपट खूप भावतो.

पुरस्काराबद्दलच अनभिज्ञ; समारंभास अनुपस्थिती
श्रुती ही अत्यंत सामान्य कुटुंबातील आहे. तिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण थेरगाव येथील प्रेरणा माध्यमिक विद्यालयात झाले. मॉडर्न महाविद्यालयात फिजिओथेरपीचे शिक्षण घेते आहे. पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त करताना श्रृती सांगते, हा पहिलाच असा शासनाचा पुरस्कार मला मिळाला याचा निश्चितच आनंद आहे. याच चित्रपटाला दादासाहेब फाळके पुरस्कारही मिळालेला आहे. खरे तर, पुरस्कार मिळेल असा विचारही मी केला नव्हता. याचे सर्व श्रेय मी पूर्णतः माझे वडिल आणि चित्रपटाच्या टीमला देते. पुरस्काराबद्दल मला कळविलेच नाही त्यामुळे तो स्वीकारण्यासाठी जाता आले नाही, याची खंत आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"