फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
पिंपरी-चिंचवड

 चिंचवड रोटरी क्लबतर्फे श्रीकांत आपटे यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान!

 चिंचवड रोटरी क्लबतर्फे श्रीकांत आपटे यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान!

अवयवदान जनजागृती दिनदर्शिका चे प्रकाशन
पिंपरी : रोटरी क्लब ऑफ चिंचवडच्या वतीने समाजात अवयवदान व देहदानाबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या V4 ऑर्गन्स फाउंडेशनचे संस्थापक श्रीकांत मुरलीधर आपटे (आपटे काका) यांचा एका भव्य कार्यक्रमात जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

viara vcc
viara vcc

चिंचवड रोटरी क्लबचे अध्यक्ष पराग जोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. चिंचवड रोटरी क्लबच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवणारा हा कार्यक्रम २७ डिसेंबर २०२६ रोजी पिंपरी येथील हॉटेल गणेश येथे मोठ्या उत्साहात पार पडला. व्यासपीठावर रोटरी क्लबचे अध्यक्ष पराग जोशी, प्रकल्प संचालक राजेश अग्रवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आपटे हे विज्ञान व कायदा या दोन्ही शाखांचे पदवीधर असून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकर्सचे प्रमाणित सहयोगी आहेत. अवयव प्रत्यारोपण समन्वयक म्हणून विशेष प्रशिक्षण घेतलेल्या आपटेकाकांना अवयवदान व प्रत्यारोपणाशी संबंधित कायदेशीर बाबी तसेच कुटुंब समुपदेशनात विशेष कौशल्य आहे. मुंबई उच्च न्यायालयात वकील म्हणून काम केल्यानंतर आणि बँक ऑफ महाराष्ट्रमधून वरिष्ठ व्यवस्थापक पदावरून २०११ मध्ये निवृत्त झाल्यावर त्यांनी पूर्णवेळ समाजसेवेला वाहून घेतले.

सध्या पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात शोक समुपदेशन केंद्राचे प्रमुख म्हणून ते कार्यरत असून मृत अवयवदात्यांच्या कुटुंबीयांना समुपदेशन करून अवयवदानासाठी प्रेरित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ते करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत १५० हून अधिक जनजागृती कार्यक्रम, ६२ देहदान, ६८ नेत्रदान व २५ त्वचादानांचे यशस्वी समन्वय साधण्यात आले आहेत. तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सहकार्याने २१ हजारांहून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रशिक्षण देऊन त्यांनी तरुण पिढीत अवयवदानाची जाणीव निर्माण केली आहे.

चिंचवड रोटरी क्लबने नागरिकांसाठी अवयवदान व सहाय्याचा विशेष उपक्रम राबवून समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श ठेवला. यावेळी सन २०२६ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले

याच कार्यक्रमात श्रीकांत मुरलीधर आपटे यांच्या दीर्घकालीन, निस्वार्थ व अखंड समाजसेवेची दखल घेत त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. अवयवदान जनजागृती चळवळीत त्यांचे योगदान अतुलनीय असून त्यांच्या कार्यामुळे हजारो कुटुंबांना नवे जीवन मिळाल्याचे गौरवोद्गार यावेळी वक्त्यांनी काढले.

या यशस्वी कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ चिंचवडचे राजेंद्र पोफळे, किरण राका, यतीश भट, महावीर सत्याना, सचिन वाडबुगर यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. अवयवदानाचे महत्त्व सांगणाऱ्या दिनदर्शिकेचे प्रकाशन आणि जीवनगौरव पुरस्काराच्या माध्यमातून रोटरी क्लब ऑफ चिंचवडने अवयवदान चळवळीला नवे बळ दिल्याचे या कार्यक्रमातून स्पष्टपणे दिसून आले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"