फक्त मुद्द्याचं!

5th September 2025
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘आयआयएम’ उभारणीचा ‘‘श्रीगणेशा’’: आमदार लांडगे

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘आयआयएम’ उभारणीचा ‘‘श्रीगणेशा’’: आमदार लांडगे

राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांचा जागा उपलब्धतेस हिरवा कंदील
पिंपरी : उद्योग नगरी, कामगार नगरी, आयटी हब आणि ऑटो हब अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात आता देशातील नामांकित भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM-नागपूर) ची शाखा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वत्र गणेश आगमनाचा उत्साह सुरू असतानाच शहरात आता आयआयएम सारखी नामांकीत संस्था सुरू करण्याचा ‘‘श्रीगणेशा’’ झाला आहे.

viara vcc
viara vcc

मोशी येथील गट क्रमांक ३२५ मधील शासकीय ७० एकर जागा
राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकल्पाला हिरवा कंदील देत ७० एकर जागा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. भाजपाचे आमदार महेश लांडगे यांचा हा ‘‘ड्रीम प्रोजेक्ट’’ आता दृष्टीक्षेपात आला आहे. शहरातील मोशी येथील गट क्रमांक ३२५ मधील शासकीय गायरान जमिनीवर आयआयएमची शाखा उभारली जाणार आहे. यामुळे पिंपरी-चिंचवडच्या लौकीकात आणखी भर पडणार असून, औद्योगिक विकासाला नवी गती मिळणार आहे. याआधी त्यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची शाखा सुरू करण्यासाठी आमदार लांडगे पुढाकार घेतला होता आणि त्याला यश मिळाले. आता आयआयएम-नागपूरची शाखा सुरू करण्याचे स्वप्न साकार होत आहे.

औद्योगिक नगरीत आयआयएमची शाखा सुरू झाल्यास रोजगार, संशोधन आणि उद्योजकतेच्या नव्या संधी निर्माण होतील. देशभरातील विद्यार्थी पिंपरी-चिंचवडमध्ये येतील, उद्योगजगताशी थेट संपर्क साधला जाईल आणि शहराची शैक्षणिक ताकद अधिक बळकट होईल, असा विश्वास आमदार लांडगे यांनी व्यक्त केला आहे.

“पिंपरी-चिंचवड हे औद्योगिक शहर असून येथे देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिक वास्तव्यास आहेत. मुंबई-पुणे कनेक्टिव्हीटी, औद्योगिक विकास आणि शैक्षणिक वातावरण लक्षात घेता आयआयएमसारखी संस्था सुरू होणे हे शहरासाठी अभिमानास्पद आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली होती. आता महसूल मंत्री यांनी जागेला मान्यता दिली आहे. IIM चे संचालक डॉ. भीमराय मेत्री यांनी पुढाकार घेतला आहे. आता ‘आयआयएम’ च्या कामाला आता गती मिळेल अशी ग्वाही आमदार महेश लांडगे यानी दिली आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"