फक्त मुद्द्याचं!

2nd December 2025
पिंपरी-चिंचवड

राहुल कलाटे आयोजित ‘श्री गणेशाचा उत्सव फोटो काँटेस्ट २०२५’

राहुल कलाटे आयोजित ‘श्री गणेशाचा उत्सव फोटो काँटेस्ट २०२५’

बक्षीस वितरण सोहळा हॉटेल टिपटॉप इंटरनॅशनल येथे संपन्न
पिंपरी : माजी नगरसेवक राहुल कलाटे यांच्या पुढाकाराने गणेशोत्सवानिमित्त गेल्या ११ वर्षांपासून सातत्याने आयोजित होणाऱ्या ‘श्री गणेशाचा उत्सव फोटो काँटेस्ट २०२५’ या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा हॉटेल टिपटॉप इंटरनॅशनल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यंदाही या स्पर्धेला पिंपरी-चिंचवड शहरवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

shree ganesh 1
shree ganesh 1

याप्रसंगी प्रांत अधिकारी विठ्ठल जोशी, पोलीस उपायुक्त विवेक पाटील, स्पर्धेच्या पर्यवेक्षक प्रणाली हरपुडे, श्रद्धा देशमुख, दर्शना माळी, रजनी मेश्राम, अजय जैन, रेणुका सूर्यवंशी, राहुल अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धकांनी गणरायाच्या आकर्षक आरास, सजावट आणि सर्जनशीलतेचे मनमोहक प्रदर्शन सादर केले. विविध गटांमध्ये आयोजित या स्पर्धेत बाल कलाकारांपासून ते सोसायटी गणपतींपर्यंतच्या सजावटींनी उपस्थितांचे लक्ष वेधले.

viara vcc
viara vcc

विजेत्यांना पारितोषिके देऊन सन्मानित
  उपस्थितांना संबोधित करताना विठ्ठल जोशी म्हणाले, राहुल कलाटे यांनी सर्वांगीण विकासातून वाकडचा कायापालट केला. विकासकामे असावी तर वाकडसारखी असा त्यांनी आदर्शच जणू आपल्या आश्वासक विकास कामातून शहराला घालून दिला आहे. आयोजक राहुल कलाटे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले, सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, ही स्पर्धा गणेशभक्तांच्या सर्जनशीलतेला, भक्तीभावाला आणि सामाजिक ऐक्याला प्रोत्साहन देते. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हीच आमच्या कार्याची खरी प्रेरणा आहे.

स्पर्धेतील विजेते
बालकलाकारांचा बाप्पा – प्रथम: स्वरूप गोल्हार, द्वितीय: अस्मि कोठारी, गौरी गणपती डेकोरेशन- प्रथम: गीता घोडके, द्वितीय: अश्विनी भोकरे, घरचा गणपती डेकोरेशन- प्रथम: रूपा वाणी, द्वितीय: पंकज बछाव, सोसायटी गणपती डेकोरेशन- प्रथम: माउंट वर्ट ट्रोपेज को-ऑपरेटिव्ह सोसायटी, वाकड, द्वितीय: ७ प्लुमेरिया ड्राईव्ह को-ऑपरेटिव्ह सोसायटी, पुनावळे

 परंपरेचा गौरव
श्री गणेशाचा उत्सव फोटो काँटेस्ट’ गेल्या ११ वर्षांपासून गणेशभक्तांच्या कलात्मकता आणि श्रद्धेला व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. आयोजक राहूल कलाटे यांनी यापुढेही ही परंपरा अधिक उत्साहाने आणि भव्यतेने साजरी करण्याचा निर्धार व्यक्त केला. या सोहळ्याने गणेशभक्तांचा उत्साह आणि सामाजिक एकता यांचे दर्शन घडवले, ज्यामुळे हा कार्यक्रम सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"