फक्त मुद्द्याचं!

24th March 2026
गुन्हेगारी

पिरंगुटमध्ये तरुणावर गोळीबार; दोन आरोपी अटकेत!

पिरंगुटमध्ये तरुणावर गोळीबार; दोन आरोपी अटकेत!

पिंपरी: दारू पिण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणावर गावठी कट्ट्यातून गोळी झाडण्यात आली. ही घटना रविवारी (९ नोव्हेंबर) पहाटे साडेपाच ते सव्वासहा वाजण्याच्या सुमारास पिरंगुट येथील सावकारवाडी भागात घडली.

ओंकार ऊर्फ सनी गोळे असे गोळीबारात जखमी झालेल्‍या तरुणाचे नाव आहे. शुभम संभाजी गोळे, संकेत सोनावणे, सागर ऊर्फ ऋषिकेश संभाजी गोळे (वय ३१) आणि महेश तानाजी कदम (वय २४, दोघेही रा. पिरंगुट, ता. मुळशी) अशी गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपींची नावे आहेत. पोलिस उपनिरीक्षक अनिल बत्‍तिशे यांनी बावधन पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, चार आरोपींनी आपसांत संगनमत करून सनी गोळे याच्याशी दारू पिण्याच्या कारणावरून वाद घालत शिवीगाळ केली. दरम्यान शुभम गोळे याने ‘पिरंगुटमध्ये फक्त माझीच चालणार’ असे म्हणत त्याच्या ताब्यातील गावठी कट्ट्यातून गोळी झाडून सनी गोळे याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत महेश कदम आणि सागर गोळे या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. बावधन पोलिस तपास करीत आहेत.

viara vcc
viara vcc

सफाई कर्मचा-यास मारहाण-दोघांवर गुन्‍हा
पिंपरी: कचरा गोळा करण्यासाठी थांबलेल्या सफाई कर्मचा-याला दोन सफाई कर्मचारी यांनी डोक्यात लोखंडी सळईने मारले. ही घटना रविवारी (९ नोव्हेंबर) दुपारी सव्वा एकच्या सुमारास भोंडवे लॉन्स, रावेत येथे घडली.

अमोल अशोक कांबळे (वय २८) आणि अमित बापू कांबळे (वय २९, दोघे रा. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड स्टेशन) अशी गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपींची नावे आहेत. शुभम विकास चव्‍हाण (वय २६, थरमॅक्स चौक, चिंचवड) असे हल्‍ल्‍यात जखमी झालेल्‍या तरुणाचे नाव असून त्‍यांनी रावेत पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी हे कचरा घेण्‍यासाठी भोंडवे लॉन्‍स, रावेत गावठाण येथे थांबले होते. त्‍यावेळी तिथे आलेल्‍या आरोपींनी फिर्यादी शुभम चव्‍हाण यांना शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तर आरोपी अमित कांबळे याने हातातील लोखंडी सळईने फिर्यादीच्या डोक्यात फटका मारून जखमी केले. रावेत पोलिस तपास करीत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"