फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड शहर भाजपा अध्यक्षपदी शत्रुघ्न काटे यांची निवड!

पिंपरी चिंचवड शहर भाजपा अध्यक्षपदी शत्रुघ्न काटे यांची निवड!

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पक्ष शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेश निवडणूक अधिकारी चैनसुख संचेती यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे .

भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा अध्यक्ष पदांच्या निवडणुका घेण्यात आले आहेत सुमारे 58 जिल्हाध्यक्षांची निवड करण्यात आली आहे . प्रदेश भाजप निवडणूक अधिकारी चैनसुख संचेती यांनी ही घोषणा केली आहे .पिंपरी चिंचवड शहर भाजपा कार्याध्यक्षपदी सध्या शत्रुघ्न काटे हे कार्यरत होते .त्यांच्याशिवाय अनेक जण अध्यक्ष पदासाठी रेसमध्ये होते. परंतु विधानसभा निवडणूक काळात ते चिंचवड मतदार संघातून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील होते .

viarasmall
viarasmall

शंकर जगताप यांना उमेदवारी मिळाल्यानंतर ते बंडखोरी करतील असा कयास होता .मात्र भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांना बंडखोरी करू नये असे आवाहन केले होते. 2017 ते 22 या पाच वर्षाच्या कालावधीत ते महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि अन्य पदांसाठी तीव्र इच्छुक असताना देखील त्यांना पाच वर्षात कोणत्याही पदाची संधी मिळाली नाही. त्यामुळे ते विधानसभा निवडणूक काळात नाराज होते .
चिंचवड मतदार संघातील शंकर जगताप यांच्याकडे शहर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी होती ते निवडून आल्याने त्यांना शहराध्यक्षपदावरून दूर व्हावे लागणार होते. राज्यभर भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका घेण्यात आल्या आहेत .

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"