पिंपरी चिंचवड भाजपा कोर्यकारी अध्यक्षपदी शत्रुघ्न काटे यांची नियुक्ती

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडीची घोषणा केली आहे. या निवडीमुळे शहर भाजपा मधील बरीचशी नाराजी कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांना चिंचवड विधानसभेची उमेदवारी मिळाली त्यांनी व त्यांच्या संपुर्ण टीमने चिंचवड विधानसभा निवडूण आणण्याकरिता लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे तिन्ही विधानसभेत संघटनात्मक रचना लावणे आता वेळेअभावी लक्ष देणे शक्य नाही असे कारण देत आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.
शत्रुघ्न काटे हे आपल्या विद्यार्थीदशेपासून विद्यार्थी चळवळीत आहेत. शिवाय गेल्या वीस बावीस वर्षांपासून विविध समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून समाजकारणात आहेत. शत्रुघ्न काटे हे स्थानिक भूमिपुत्र असून ते यशस्वी बांधकाम आणि हॅाटेल व्यावसायिक आहेत. सामाजिक काम, नम्र स्वभाव व सुसंस्कृत उच्च शिक्षित चेहरा. यामुळे साधारण तीन टर्म पिंपळे सौदागर सारख्या उच्चभ्रू भागातून भरघोस मतांनी निवडूण येणारे नगरसेवक आहेत.त्यांनी २०१४ मधे पक्षात प्रवेश केला आणि गेल्या दहा वर्षांपासून ते पक्ष विस्ताराकरिता संघटनेचे उत्तमरित्या त्यांनी काम केले आहे
पिंपरी चिंचवड भाजपाला शहराला स्थानिक चेहऱ्याची आवश्यकता व आत्ताची चिंचवड विधानसभा निवडणूक व अगामी महानगरपालिका निवडणूकांचा विचार करता शत्रुघ्न काटे सारख्या ताकदवान आणि नम्र कार्यकर्त्याला ताकद दिली पाहीजे असे लक्षात आल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शत्रुघ्न काटे यांना शहराध्यक्ष पदाची जबाबदारी देण्याची सूचना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना केली आहे.
मागील दहा वर्षात त्यांना भाजपा पक्षश्रेष्टींनी कोणतेही महत्वाचे पद दिले नाही .त्यामुळे काटे यांनी नाराजी व्यक्त करत जगताप कुटुबिंयाविरोधात आवाज उठविला होता. भाजपा पक्षांतर्गत गटबाजी वाढू नये म्हणून काटे यांना शहराध्यक्षपद देण्यात आल्याची चर्चा आहे.