फक्त मुद्द्याचं!

29th March 2026
पिंपरी-चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस गटनेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांची निवड!

राष्ट्रवादी काँग्रेस गटनेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांची निवड!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांची निवड करण्यात आली. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा चे चे 37 नगरसेवक निवडून आले आहेत . राष्ट्रवादी काँग्रेस गटाची नोंदणी बुधवार 4 जानेवारी रोजी पुणे विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे. पक्षाच्या गटनेतेपदी भोईर यांची निवड झाल्याने ते महापालिकेत विरोधी पक्षनेते असणार आहेत.

viara vcc
viara vcc

शुक्रवार सहा फेब्रुवारी रोजी महापौर पदाची निवडणूक असल्याने त्यापूर्वी महापालिकेत निवडून आलेल्या पक्षांच्या गटनेत्यांची निवड करून त्यांची विभागीय आयुक्तांकडे नोंदणी करणे आवश्यक असते. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांची गटनेते म्हणून निवड करण्याची सूचना शहराध्यक्ष योगेश बहल यांना केली होती .त्यानुसार भोईर यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. महापालिकेत 84 जागा भारतीय जनता पक्षाने जिंकले असून ते बहुमतात आहेत .त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 37 जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष बनला आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मिळणार आहे.

भाऊसाहेब भोईर हे सभागृहातील ज्येष्ठ नेते आहेत. ते आजपर्यंत सहा वेळा महापालिकेत निवडून आले आहेत. सन 2010 मध्ये त्यांनी काँग्रेस कडून विरोधी पक्षनेतेपद भूषवले आहे. ते काँग्रेसचे शहराध्यक्ष होते .मराठी राज्य नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शाखा अध्यक्ष आहेत.

निवडणुकीच्या काळात पिंपरी चिंचवड महापालिकेतील चुकीच्या कामासंदर्भात दिवंगत नेते अजित पवार यांनी संताप व्यक्त केला होता .अशा चुकीच्या कामांना सभागृहात आणि बाहेर सतत विरोध केला जाईल अशी ग्वाही गटनेतेपदी निवड झाल्यानंतर भाऊसाहेब भोईर यांनी दिली. आमचे नेते अजित दादा पवार यांच्या अचानक जाण्याने पक्षावर आणि आमच्यावर मोठा आघात झाला आहे .त्यामुळे चुकीच्या कामांना विरोध विरोध केला जाईल, हीच अजित दादांना श्रद्धांजली ठरेल असे भोईर यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पार्थ पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे नेते आहेत. ते शहरासंदर्भात निर्णय घेतील असे भोईर यांनी सांगितले .राष्ट्रवादी काँग्रेस गटनेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांची निवड

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"