भक्तीधाम टूर्स अँड ट्रॅव्हल कंपनीकडून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक!

9 लाख 45 हजार रुपयांची फसवणुक
पिंपरी ज्येष्ठ नागरिकांना कमी खर्चात हेलिकॉप्टरने चार धाम यात्रे करता घेऊन जाण्याचे आश्वासन देऊन हास्य क्लब मधील 54 लोकांची अकरा लाख 85 हजार रुपयाची फसवणूक केल्याची फिर्याद सांगवी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे ही घटना 30 नोव्हेंबर ते 25 डिसेंबर या कालावधीत आनंद हास्य क्लब बाळासाहेब कुंजीर स्टेडियम कुंजीर चौक पिंपळे सौदागर येथे घडली

या फसवणूक प्रकरणी आनंद हास्य क्लबचे राजेंद्रनाथ हजारे राम जयस्वाल फ्लॅट नंबर 502, वरूणा रेसिडेन्सी, पिंपळे सौदागर यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे योगेश प्रभाकर देशमुख( शेजुळ) भक्तीधाम दर्शन टूर्स, पत्ता- ऑफिस नंबर 206, दुसरा मजला, ऑर्चिड कॉम्प्लेक्स, नातूबाग गणपती मंदिराजवळ, सदाशिव पेठ, बाजीराव रोड पुणे असे आरोपीचे नाव आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी याने माझी भक्तीधाम टूर्स अँड ट्रॅव्हल या नावाची एजन्सी असून ज्येष्ठ नागरिकांना कमी खर्चात हेलिकॉप्टरने चारधाम यात्रे करता घेऊन जातो असे सांगितले फिर्यादी यांनी पत्नीसह हास्य क्लब मधील इतर 52 लोकांनी प्रत्येकी 45 हजार रुपये आरोपी यास ऑनलाइन तसेच रोख स्वरूपात दिले 54 लोकांपैकी 28 लोकांना चारधाम यात्रे करता घेऊन गेला मात्र ठरल्याप्रमाणे 16 लोकांकडून हेलिकॉप्टरचे अधिकचे प्रत्येकी 15000 रुपये असे एकूण दोन लाख 40 हजार रुपये घेऊन हेलिकॉप्टरची सेवा दिली नाही व अधिकचे पैसे देखील परत दिले नाही उरलेल्या 26 लोकांपैकी पाच लोकांचे मिळून दोन लाख 25 हजार रुपये फक्त परत केले व उरलेल्या 21 लोकांचे एकूण नऊ लाख 45 हजार रुपये थोड्याच दिवसात परत देतो असे सांगून आज पर्यंत अकरा लाख 45 हजार परत न करता आर्थिक फसवणूक केली आहे याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चापाले पुढील तपास करीत आहेत

