फक्त मुद्द्याचं!

5th February 2026
गुन्हेगारी

पोलीस अधिकारी असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकाची 34 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक!

पोलीस अधिकारी असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकाची 34 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक!

पिंपरी : पोलीस अधिकारी असल्याचे सांगून जबरदस्तीने फ्रॉड केस मध्ये कारवाई करण्याचे एका ज्येष्ठ नागरिकाला डिजिटल अटक करण्याची भीती दाखवून जबरदस्तीने बॅक खात्यातून 34 लाख 80 हजार रुपये कढून फसवणूक केली आहे. ही घटना 27 नोव्हेंबर व 29 डिसेंबर 2025 या कालावधीत रा प्लॅट नंबर बी 20, रो हाऊस नंबर डी चार, साई रेसिडेन्सी, मावळ लँड, ता तळेगाव दाभाडे येथे घडली.

viara vcc
viara vcc

याबाबत ज्येष्ठ नागरिक दिवाकर पांडुरंग पंचवाडकर (वय 73) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. व्हाट्सअप ,मोबाईल क्रमांक व विविध बँकांचे अकाउंट खातेदार यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीची आर्थिक फसवणूक करण्याच्या उद्देशाने पोलीस अधिकारी असल्याचे सांगून आणि डिजिटल अटक करण्याची भीती घालून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे नाव व कागदपत्रे पाठवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. फिर्यादी कडून जबरदस्तीने त्यांच्या अकाउंट वरील 34 लाख 80 हजार रुपयाची रक्कम वेगवेगळ्या बँक अकाउंट वर जमा करण्यास भाग पाडले. ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अटकेची भीती दाखवून फसवणूक करण्याचे प्रकार गेल्या काही महिन्यांपासून वाढत आहेत. आयुष्यभर कमवलेली पुंजी अशा प्रकारे लुटली जाते ही एक शोकांतिका आहे .तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कांबळे हे पुढील तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"