स्कोअर स्पोर्ट्स अकॅडमी व ऑल स्टार्स क्रिकेट अकॅडमी अंतिम फेरीत दाखल!

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या,फोर स्टार क्रिकेट मैदान, हिंजवडी येथे सुरू असलेल्या १९ वर्षाखालील मुलींच्या २५ षटकांच्या “पिंपरी चिंचवड करंडक” क्रिकेट स्पर्धांच्या आज सातव्या दिवशी आज स्कोअर स्पोर्ट्स अकॅडमी व ऑल स्टार्स क्रिकेट अकॅडमीने आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविला.स्कोअर स्पोर्ट्स अकॅडमी ,ऑल स्टार्स क्रिकेट अकॅडमी अंतिम फेरीत दाखल झाले.
स्कोअर स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमी ५२ धावांनी विजयी
१) स्कोअर स्पोर्ट्स अकॅडमीने प्रथम फलंदाजी करताना २५ षटकात ९ बाद १३६ धावा केल्या; त्यास प्रत्युत्तर देताना परंदवाल गर्ल्स २०.५ षटकात सर्व बाद ८४ धावा करू शकल्या .
स्कोअर स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमी ५२ धावांनी विजयी झाली. या सामन्यात अस्मिता शिंदे सामनावीर झाली.
स्कोअर स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमी २५ षटके ९ बाद १३६ धावा :- समीक्षा पवार २३, आर्या चिखलीकर १०, सानिका शिंदे २७, मेधावी दीक्षित ११,अर्पिता धायगुडे १५,वैष्णवी म्हाळसकर १६/३ अस्मिता जाधव ८/२, अन्वी दर्शले १३/१
परंदवाल गर्ल्स २०.५ षटके सर्वबाद ८४ धावा :- सुहानी कहांडळ २९, अनुष्का वाकोडे १०, मेघना मोळे ११,अस्मिता शिंदे १५/५, समीक्षा शेवाळे १५/३, मेधावी दीक्षित ३/१.

ऑल स्टार ५५ धावांनी विजयी
२ ) ऑल स्टार्स क्रिकेट अकॅडमीने प्रथम फलंदाजी करताना २५ षटकात ७ बाद १६६ धावा केल्या त्यास प्रत्युत्तर देताना दिवेकर क्रिकेट अकॅडमीने २५ षटकात ९ बाद १११ केल्या. ऑल स्टार ५५ धावांनी विजयी झाली अनन्या दर्शले सामनावीर झाली.
ऑल स्टार्स क्रिकेट अकॅडमी २५ षटके ७ बाद १६६ धावा:- सिद्धी राणे ६०, अनन्या दर्शले ५७, सौमय्या भामरे १५, रुही सिंग १९/५, तन्वी खळदकर २६/१.
दिवेकर क्रिकेट अकॅडमी २५ षटके ९ बाद १११ धावा :-यशस्वी वाघमारे १६, तन्वी खळदकर २५, सिद्धी लोणकर १3, वैदेही डेरे १५/१,आदिती लांडे १४/२, शर्वरी खिलारी १९/२, रश्मी जगदाळे ११/२. ऑल स्टार ५५ धावांनी विजयी झाली.
पंच आनंद गुप्ता यांच्या हस्ते अनन्या दर्शले हिस सामनावीराचे पारितोषक देण्यात आले.