जीवनातील आनंदासाठी कला आत्मसात करावी

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी: जीवनातील आनंद शोधण्यासाठी किमान एक कला अंगी आत्मसात केली पाहिजे, असे मत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या प्रा. रामकृष्ण मोरे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय सांस्कृतिक व साहित्यिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्यामध्ये कलेची आवड निर्माण व्हावी या हेतूने विविध कलाप्रकाराचे आयोजन करण्यात आले . या स्पर्धांमध्ये सामाजिक समस्यांवर आधारित पोवाडा गायन, सामाजिक आशयावर स्वरचित कविता, ताणतणाव मुक्त जीवन : मिथक की वास्तव?, योग, अवयवदान व व्यसनाधीनता, शून्य कचरा व्यवस्थापन अशा विषयांवर निबंध व पोस्टर स्पर्धा, तसेच लिंगभेद संवेदीकरण, व्यसन आणि तरुण, महाविद्यालयीन युवक व ताणतणाव अशा विविध विषयांवर निबंध, वक्तृत्व, भित्तीचित्र,पोवाडागायन, पथनाट्य इत्यादी स्पर्धांचे आयोजन केले गेले असून पुणे शहर व पुणे ग्रामीण विभागातून विविध महाविद्यालयांमधील ७४५ विद्यार्थी सहभागी झाले होते.
सदर स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी अखिल भारतीय नाट्य परिषद पिंपरी चिंचवड अध्यक्ष श्री.भाऊराव भोईर व सावित्रीबाई पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागचे संचालक डॉ.सदानंद भोसले उपस्थित होते.भोईर यांनी आपल्या मनोगतातून पु. ल. देशपांडे, प्र. के. आत्रे .यांसारख्या थोर कलवंतांचे गुण आत्मसात करून प्रत्येकाने जीवनात एकतरी कला आत्मसात करावी व जीवनातील आंनद शोधला पाहिजे असे मत व्यक्त केले. संचालक डॉ. सदानंद भोसले यांनी महाराष्ट्रातील थोर कलावंतावर अभ्यास केला गेला तर प्रत्येकावर एक स्वतंत्र विद्यापीठ निर्माण होईल. कला ही विद्यार्थीमध्ये समाज घडविणारे एक चालते बोलते व्यासपीठ उपलब्ध करते.कवितेच्या सादरीकरणातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी विकसित करण्याचा प्रयत्न स्पर्धकांना मध्ये करण्यात आला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.जी.लोबो यांनी स्पर्धेचे आयोजन आमच्या महाविद्यालयात करण्याची सुवर्णसंधी दिली या बद्दल विद्यापीठाचे आभार मानले.प्राचार्य डॉ.बी.जी.लोबो उपप्राचार्य डॉ. एच.बी. सोनवणे रजिस्टर श्री. संजय झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. सारिका मोहोळ, डॉ . दत्तात्रय भांगे, डॉ. मधुकर राठोड डॉ. आमश्या पाडवी, डॉ. पूनम वाणी व श्रीमती. रोहिणी तिटकारे यांनी कार्यक्रमांचे नियोजन केले. तसेच सदर स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये महाविद्यालयातील विविध विभागातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सर्व सहभागी स्वयंसेवक यांनी कार्यक्रम व्यवस्थित पार 0पाडण्यात मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सारिका मोहोळ आणि आभार प्रा.विक्रांत शेळके यांनी केले.